अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंद हाकेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.,वंचित बहुजन आघाडीच्या आवाहना वरून तेल्हारा शहर, हिवरखेड अडगांव,दानापूर,गोर्धा, तळेगाव बाजार सह तालुक्यातील बहुतांश गावात कळकळीत बंद.
अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंद हाकेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.,वंचित बहुजन आघाडीच्या आवाहना वरून तेल्हारा शहर, हिवरखेड अडगांव,दानापूर,गोर्धा, तळेगाव बाजार सह तालुक्यातील बहुतांश गावात कळकळीत बंद.
अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंद हाकेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.,वंचित बहुजन आघाडीच्या आवाहना वरून तेल्हारा शहर, हिवरखेड अडगांव,दानापूर,गोर्धा, तळेगाव बाजार सह तालुक्यातील बहुतांश गावात कळकळीत बंद.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला तेल्हारा शहरात सह तालुक्यातील व्यापारी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शहरासह हिवरखेड, अडगांव, दानापूर, तळेगाव बाजार,गोर्धा, बेलखेड सह काही लहान मोठ्या गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीचे तेल्हारा तालुका अध्यक्ष अशोक दारोकार यांच्या नेतृत्वाखाली तेल्हारा शहरा सह तालुक्यातील लहान मोठ्या गावात पूर्णपणे कडकडीत बंद राहिले.

बंदच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा शहरातील मुख्य बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने व विविध व्यावसायिक आस्थापना दिवसभर बंद राहिल्या. व्यापारी, नागरिक व विविध सामाजिक संघटनांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांवरील अत्याचाराचा निषेध नोंदविला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटासह इतर काही राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनीही या बंदला जाहीर पाठिंबा देत आंदोलनाला आपला सहभाग नोंदविला.

यावेळी अशोक दारोकार (वंचित बहुजन आघाडी, तेल्हारा तालुका अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली सैफुल्ला खान , भंते ज्योतीपुत्र, मधुकर बरिंगे, झिया शाह, नाजुकराव दारोकार, प्रवीण पोहकर, कैलास ठोकणे (नगरसेवक), राजेश खारोडे (नगरसेवक), रामाभाऊ फाटकर, श्रीकृष्ण कवर, जीवन बोदडे, प्रा. संजय हिवराळे, अरविंद तिव्हाने, मोहम्मद इद्रिस, अनिल मोहोड, विवेक खारोडे (उ. बा. ठा.शिवसेना), रोशन दारोकार, सिद्धार्थ गवारगुरु, प्रदीप तेलगोटे, नितीन वानखडे, आनंद बोदडे, अमर भारसाकळे, सुभाष भड, नागसेन तायडे, रवींद्र खर्चे, प्रताप गव्हांदे, दीपक बायस्कार, नितीन गावंडे, राजू वरठे, देवानंद मोहोड, रवींद्र मोहोळ, विजय मोहोळ, सुरेंद्र भोजने, मो. राजिक, भाऊराव थोरात, चंदू बोरसे, अरुण वानखडे, पंकज भारसाकळे, मोहम्मद सलीम, अजहर भाई, आदिल भाई, वीनाताई मोहोळ, सोनू दारोकार, देवानंद पोहरकर, राजपाल तायडे, सुनील तायडे, रामेश्वर पोहेकर, रवींद्र दामोदर, सुभाष पोहरकर, संजय तायडे, शहाबाज खान, अजय इंगळे, अनंता इंगळे, समाधान वाकोडे, गोवर्धन मोहोळ, उत्तम सरदार, अमोल वरठे, अक्षय साबळे, शिवहरी बाहे, योगेश अढाऊ, गौतम वानखडे, प्रवीण पोहरकर, नितीन तायडे, सम्यक बोदडे, रुपेश तायडे, पवन बोदडे, सिद्धार्थ पोहरकर आणि अजय हिवराळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी बंद यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यां यांच्या मते लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे अत्यंत निषेधार्ह असून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

बंद दरम्यान शहरात शांतता कायम राहिली. तेल्हारा व हिवरखेड पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक बंदोबस्त ठेवला होता. तेल्हारा शहर व तालुक्यातील कडकडीत बंदला व्यापारी बांधवांचा तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला दिसून आला.


