Uncategorized

गरूडझेप मोहीम आग्रा ते राजगड मध्ये तेल्हारा तालुक्यातील सहभाग.

बेलखेड चा अरुण जाधव सहभागी.

गरूडझेप मोहीम आग्रा ते राजगड मध्ये तेल्हारा तालुक्यातील सहभाग.
बेलखेड चा अरुण जाधव सहभागी.

पुणे –
शिवरायांनी आग्रा ते राजगड ही गरूड झेप घेत औरंगजेबच्या हातावर तुरी देत स्वराज्यात सुखरूप परत आले होते. स्वराज्य पायदळ प्रमुख पिलाजीराजे गोळे यांचे थेट वंशज ॲड.मारोती आबा गोळे यांनी आग्रा ते राजगड १५०० कि.मी. पायदळ गरूडझेप मोहिम काढत शिवरायांचा ह्या महापराक्रमाची लोकजागृती केली आहे.

या मोहीमेत बेलखेड तेल्हारा येथील अरूण जाधव सहभागी होत असतात.अरूण जाधव हे आपल्या वर्ग शिक्षीका कमल प्रभाकरराव सावरकर व गुंजन गोळे यांच्या प्रेरणेने दरवर्षी सहभागी होतात.श्रीमती कमल प्रभाकरराव सावरकर ह्यांचे माहेर गोळे कंटुबातील असून ॲड.मारोती गोळे यांचे विदर्भातील कुटुंब शाखा असून त्यांचेमुळे इतिहास बालपणा पासून रूजवला गेला असल्याने अरूण गजानन जाधव विदर्भात या मोहीमेचा प्रचार प्रसार करीत आहेत.

गरूडझेप मोहीम आग्रा ते राजगड काढणारे ॲड मारोती आबा गोळे यांचे पाठपुराव्याने शासनाने१७ ॲागष्ट शिवचातुर्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे .
१७ ॲागष्टला शिवचातुर्य दिन म्हणून साजरा करण्याच्या निर्णयाचे स्वागत करत खासदार अनुप धोत्रे व शासन यांचे आभार श्रीमती कमल प्रभाकरराव सावरकर यांनी एका पत्रकातून केले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!