
बेलखेड ग्राम वैभव श्री बेलेश्वर महादेव मंदीर.
पुरातन शिवलिंग मंदीर
बेलखेड -(ता.तेल्हारा जि. अकोला)
गावचे मोठेपण हे तेथील लोकां वर आणि वैविध्य पूर्ण सम्पादेत लपलेल असते असे मानले जाते ,
आपले गाव “बेलखेड “सुध्दा एक सम्पन्न गाव म्हणून प्रसिद्ध आहे. आध्यात्मिक द्रुष्टीने गावचा विचार करू या गावात दोन प्राचीन मंदिरे आहेत. एक महादेव आणि दूसरे मोठा मारोती महादेव हे बेलखेड गावचे दैवत असून या मंदिरात दोन शिवलिंगे आहेत.

एक फार प्राचीन आणि चौकोनी आकाराचे आहे त्या विषयी माहिती घेतली असता ते फार प्राचीन आणि सिद्ध आहे अशी माहिती मिळाली अश्या आकाराचे शिवलिंग हे दुर्मिळच गावाची लोकवस्ती ही 1800व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली असावी असा तर्क आहे. त्या आगोदर हे शिवलिंग आहे त्या स्वरूपात आणि आहे त्याच ठिकाणी काळ्या पाषाना चे हे शिवलिंग स्थापित आहे आणि दूसरे शिवलिंग हे गाभाऱ्यात आहे मानवी मनाला क्षणात भुरळ घालून जिवा शिवा च्या मिलन दर्शनाचे समाधान प्राप्त होते.

मंदिर जीर्नोधार आणि लोक वर्गणीतून मंदिर स्थापनेच्या वेळी हे नवीन शिवलिंग स्थापन करण्यात आले पूर्वी येथे यात्रा ही भरायची येणाऱ्या पिका समंधि भाग पाहण्याची प्रथे साठी हे मंदिर पंचक्रोशित प्रसिद्ध होते. बाजूला विठोबा रूख्मिनि चे मंदिर आहे. कर्म योग सांगणार्या गाडगेबाबा नी या मंदिराला भेट दिली होती त्याची आठवण म्हणून त्यांची मुर्ती ही येथे पाहण्यास मिळते.

दर वर्षी वसंत पौर्णिमेला महादेव पालखीतून ग्राम प्रदक्षिणा करतात. वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढली जाते आणि भव्य भंडारा केला जातो वर्ष भर कार्यक्रम सुरू असतात.

बेलखेडवाशी जन माणसा चे महादेव मंदिर हे आस्था आणि विश्वासाचे प्रतीक आहे. प्रत्तेक संकटातून तो आम्हा सर्वाना सुखरूप ठेवतो ही सर्व त्या भोळ्या शंकरा ची च क्रुपा आज मानाने फडफड्नारा झेंडा आम्हा सर्व गावकर्या ना नेहमी उर्जा देत राहतो.
शब्दांकन –
अतुल निमकर्डे
9767936177