आपला जिल्हा अकोला

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद., १५० हून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी; नामांकित कंपन्यांकडून मुलाखती.

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद., १५० हून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी; नामांकित कंपन्यांकडून मुलाखती.

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद., १५० हून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी; नामांकित कंपन्यांकडून मुलाखती.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला, मॉडेल करिअर सेंटर, अकोला आणि डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय, गाडेगाव (तेल्हारा) येथील वाणिज्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात पार पडला.या मेळाव्यास १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रफुल्ल शेळके, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अण्णासाहेब ढोले होते. प्रमुख अतिथी म्हणून नागेश देशपांडे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी उपस्थित होते. तसेच भय्यासाहेब देशमुख, बाळासाहेब मार्के, रमेश कोकाटे, ॲड. विश्वासराव नेरकर, साहेबराव सोनमाळे व सुधाकर येवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

मेळाव्यात वैभव बायोटेक, सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज लि., एल. अँड टी. फायनान्स लि., वन एशिया नेटवर्क इंडिया प्रा. लि. आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक या नामांकित कंपन्यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.

नागेश देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. गोपाल ढोले यांनी मनोगत व्यक्त केले. उद्घाटक प्रफुल्ल शेळके यांनी शासनाच्या कौशल्य विकास व रोजगार योजनांची माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर अध्यक्ष अण्णासाहेब ढोले यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी कौशल्य, आत्मविश्वास आणि सातत्याच्या बळावर यश संपादन करावे, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वप्नील फोकमारे यांनी केले, तर वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एम. एम. कवरके यांनी आभार प्रदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रोजगार मेळावा यशस्वीपणे पार पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिन ढोले, हिंमत फोकमारे, किशोर ढोले, अभिजीत लोखंडे तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!