जिल्हाधिकाऱ्यांचा तेल्हारा दौरा, नुकसानग्रस्त शेताची पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद. नागरिकांच्या अडचणीचे तात्काळ निराकरण करा -जिल्हाधिकारी वर्षा मीना
जिल्हाधिकाऱ्यांचा तेल्हारा दौरा, नुकसानग्रस्त शेताची पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद. नागरिकांच्या अडचणीचे तात्काळ निराकरण करा -जिल्हाधिकारी वर्षा मीना
जिल्हाधिकाऱ्यांचा तेल्हारा दौरा, नुकसानग्रस्त शेताची पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद. नागरिकांच्या अडचणीचे तात्काळ निराकरण करा -जिल्हाधिकारी वर्षा मीना

जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी तेल्हारा तालुक्यातील विविध विकासकामे तसेच प्रशासकीय यंत्रणांचा आढावा घेऊन नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी अडसूळ परिसरातील वीट भट्ट्याना भेटी दिल्या व तेथील मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची व आरोग्याच्या काळजी घेण्याचे निर्देश दिले. शेताच्या बांधावर सोयाबीन पिकाच्या उगवणीबाबत असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पाहणीही त्यांनी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.

नगरपरिषद तेल्हाराअंतर्गत करण्यात आलेली विकास कामे शेगाव नाका परिसरातील बगीचा, व्यापारी संकुल व घन कचरा व्यवस्थापन स्थळाला त्यांनी भेट दिली.यावेळी नगराध्यक्षा सौ. वैशाली पालीवाल, नगरसेवक,मुख्याधिकारी सतीश गावंडे उपस्थित होते.तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना विविध योजना अंतर्गत लाभार्थी पाहणी व अंमलबजावणीचा आढावा घेतला. यादरम्यान हिंगणी खुर्द येथील प्रगतिशील शेतकरी सचिन कोरडे, सुशील कोरडे यांच्या केळी प्रक्रिया केंद्राला भेट दिली तसेच पानपिंपरी व कोल्ड स्टोरेज बांधकाम ठिकाणाचीही पाहणी केली.

हिवरखेड नगरपरिषद येथील सुरू असलेल्या नमो उद्यान बांधकामाला भेट दिली व विहित वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अस्थी कलश व स्मारकाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी हिवरखेडच्या नगराध्यक्ष सुलभा दुतोंडे, तहसीलदार महेश रामगुंडे, हिवरखेड मुख्याधिकारी सतीश गावंडे आदी उपस्थित होते.
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे अनुषंगाने आढावाही त्यांनी घेतला.

जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी मौजे थार येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले व प्रशासनाकडून आवश्यक तात्काळ मदत वितरित करण्याचे निर्देश दिले. पंचगव्हाण येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराची पाहणी त्यांनी केली.

तेल्हारा नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेते यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व आपल्या अडचणी सांगितल्या विशेषतः पांढरी भागातील विकासाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी नगर परिषद सदस्य उपस्थित होते.

अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना मॅडम यांचे हिवरखेड येथील पत्रकार यांनी स्वागत करून रेल्वे संबंधी महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन दिले.