महाराष्ट्रात पहिला मुद्रांक विक्री परवाना मिळविण्याचा बहुमान अडगावच्या सेंट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटीला प्राप्त.
महाराष्ट्रात पहिला मुद्रांक विक्री परवाना मिळविण्याचा बहुमान अडगावच्या सेंट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटीला प्राप्त.
महाराष्ट्रात पहिला मुद्रांक विक्री परवाना मिळविण्याचा बहुमान अडगावच्या सेंट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटीला प्राप्त.

तेल्हारा तालुक्यातील अडगांव बु. येथील सेंट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटीला मुद्रांक विक्री परवाने बंद झाल्यानंतर संस्था म्हणून महाराष्ट्रात पहिला मुद्रांक विक्री परवाना प्राप्त झाला आहे. ही सोसायटी करिता ऐतिहासिक घटना मानली जात आहे. जनमानसात विश्वासपात्र सोसायटी, “विना सहकार नाही उद्धार” हा मंत्र जोपासणारी म्हणून गणल्या जाणाऱ्या या सोसायटीने प्रक्रिया पूर्ण करीत आजपासून अडगाव बु.।। आणि परिसरातील शेतकरी आणि विद्यार्थी वर्गाकरिता आवश्यक असलेले ५०० रुपये, व १०० रुपयाचे स्टॅम्प पेपर (मुद्रांक) तसेच २० रुपये, १० रुपये व ५ रुपये कोर्ट फी स्टॅम्प आपल्या सेंट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटी मध्ये कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. सर्वांच्या सहकार्याने संस्था दिवसेंदिवस प्रगती करीत आहे.

विशेष असे की भागधारकांना १० लाभांश देणारी सहकार क्षेत्रातील जिल्ह्यातील एकमेव असलेल्या या संस्थेचे या आधीचे खत विक्री केंद्र ,स्वस्त धान्य दुकान ,त्यानंतर माती परीक्षण केंद्र, विद्युत बिल स्वीकार केंद्र, ग्राहक सेवा केंद्र, लॅमिनेशन वर्क आणि आता मुद्रांक विक्री परवाना मिळवून संस्थेने ऐतिहासिक असा समाजसेवा उपक्रम हाती घेतला आहे. भविष्यात संस्थेचे यशोदा नगर मधील संस्थेच्या स्वमालकीच्या जागेत शेतकऱ्यांच्या सेवेत मोठ्या क्षमतेचे गोडाऊन प्रस्तावित आहे.
सोसायटी चे अध्यक्ष मनोहर फाफट, उपाध्यक्ष तौफिकभाई, सचिव गजानन मानकर, संचालक गणेश चौखंडे, गजानन मुंगसे अशा सेवाभावी संचालक मंडळाच्या मार्गदर्शनात सोसायटी प्रगती कडे वाटचाल करीत आहे. अशी माहिती संस्थेच्या वतीने वृत्तपत्र प्रतिनिधींना देण्यात आली आहे.