आपला जिल्हा अकोला

शांतीकुमार प्रभाकरराव सावरकर यांची श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा मुख्याध्यापक पदी नियुक्ती. 

शांतीकुमार प्रभाकरराव सावरकर यांची श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा मुख्याध्यापक पदी नियुक्ती. 

शांतीकुमार प्रभाकरराव सावरकर यांची श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा मुख्याध्यापक पदी नियुक्ती.

तेल्हारा – श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व्दारा संचालित श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे मुख्याध्यापक पदावर शांतीकुमार प्रभाकरराव सावरकर यांची सेवाज्येष्ठता नुसार नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख साहेब, सर्व कार्यकारिणी सदस्य ‌तथा आजिव सदस्य यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.

शांतीकुमार सावरकर यांचा शैक्षणिक क्षेत्रातील मोठा अनुभव व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी सततची मदत करण्याची वृत्ती व तालुक्यातील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून राष्ट्रीय खेळाडू निर्माण केले. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना मुख्याध्यापक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

नियुक्ती झाल्यानंतर संस्था अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख साहेब, उपाध्यक्ष अॅड गजाननराव पुंडकर, भैय्या साहेब पाटील पुसदेकर, केशवराव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीपराव इंगोले,सदस्य हेमंतराव काळमेघ, प्रा केशवराव गावंडे, सुरेशदादा खोटरे, प्रा सुभाष बनसोड, सचिव डॉ वि.गो.ठाकरे, प्राचार्य डॉ अंबादास कुलट, विजय ठोकळ,सरव्यवस्थापक पंडीत पंडागळे यांनी नियुक्ती वेळी अमरावती येथे शुभकामना दिल्या. 

तसेच तेल्हारा येथे संस्थेचे आजीव सदस्य डॉ विलासराव भांबुरकर, शाळा तपासणी अधिकारी उद्धव विखे, सुधीर बापू देशमुख, विदर्भ माध्यमिक संघाचे गणी शहा, तराळे सर, सुनिल हिंगणकर यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. 

तालुक्यातील सर्व सन्माननीय आजिव सदस्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, पालक, शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा देवून सत्कार केला.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!