ग्रामपंचायत निवडणुका जुन्याच मतदार यादीप्रमाणे होणार., निवडणूक आयोगाकडून जाहीर.
ग्रामपंचायत निवडणुका जुन्याच मतदार यादीप्रमाणे होणार., निवडणूक आयोगाकडून जाहीर.
ग्रामपंचायत निवडणुका जुन्याच मतदार यादीप्रमाणे होणार., निवडणूक आयोगाकडून जाहीर.

राज्यातील मुदत संपलेल्या (सन २०२४, २०२५ आणि २०२६) तसेच नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या आगामी निवडणुकांसाठी १५ एप्रिल २०२६ रोजीची विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पदाधिकारी, ग्रामस्थ आणि संभाव्य उमेदवारांसाठी हा मतदार यादीचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या कालावधीत नागरिकांना आपल्या नावांची खात्री करता येणार असून, हरकती व सूचना वेळेत दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेले वेळापत्रक –
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणेः २४ जुलै २०२६
हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधीः२४ जुलै ते २९ जुलै २०२६
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे: ४ ऑगस्ट २०२६