आपला जिल्हा अकोलाआर्थिक

इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या विविध योजना.

इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या विविध योजना.

इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या विविध योजना.

अकोला, दि. 6 : राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळातर्फे इमाव प्रवर्गासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत.

महामंडळाचे अकोल्यातील कार्यालय निमवाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात आहे. योजनांविषयी जाणून घेऊ या.

वीस टक्के बीजभांडवल योजना –

ही योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबवली जाते. महामंडळाचा सहभाग २० टक्के, लाभार्थ्यांचा पाच टक्के आणि बँकेची ७५ टक्के सहभाग असतो. महत्तम प्रकल्प मर्यादा ५ लक्ष रू. आहे. अर्जदाराचे वय १८ ते ५० हवे.

थेट कर्ज योजना –

महत्तम कर्ज मर्यादा १ लक्ष, शेतीला पूरक किंवा छोट्या व्यवसायासाठी अर्ज मिळते.परतफेडीचा काळ ५ वर्ष. नियमित फेडल्यास व्याज नाही. थकित हप्त्यांवर वार्षिक ४ टक्के व्याज. कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रू. व अर्जदाराचे वय १८ ते ५५ हवे.

 वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना –

गरजू कुशल व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच व्यवसाय वृद्धीसाठी ही योजना राज्यातील राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत तसेच सरकारी बँकेमार्फत राबवली जाते. व्यवसायासाठी मागणीनुसार १ ते १० लक्ष रू. पर्यंत रक्कम बँकेमार्फत देण्यात येते.

बँकेचे कर्ज नियमित परतफेड केल्यास महामंडळामार्फत १२ टक्क्यांपर्यंत व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात लाभार्थीला मिळते. लाभार्थीने कर्जासाठी ऑनलाइन अर्ज महामंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज करावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लक्षपर्यंत असावे. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष असावे. 

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना –

उच्च शिक्षणाकरिता देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय अभ्याक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता रु. १० ते २० लक्ष इतके महत्तम कर्ज बँकेमार्फत दिले जाते, बँकेचे कर्ज नियमित परतफेड केल्यास महामंडळामार्फत १२ टक्क्यांपर्यंत व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात लाभार्थीला देण्यात येते. या कर्जासाठी अर्हता अशी की, अर्जदार इयत्ता बारावीत ६० टक्के व अधिक गुणांनी उत्तीर्ण असावा. अर्जदाराचे वय १७ ते ३० असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लक्ष पर्यंत असावे. 

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना –

इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरीब व होतकरू महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्यातील बचत गटातील उत्पादित केलेल्या वस्तूंचे उत्पादन प्रक्रिया व मूल्य आधारित उद्योगांकरिता बैंकमार्फत मंजूर करण्यात आलेल्या रु. ५ ते १० लक्ष पर्यंतच्या कर्ज रक्क्मेवरील १२ टक्के व्याज परतावा उपलब्ध करून देण्यात येते.

ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत लोकसंचालित साधन केंद्राच्या सहाय्याने राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेणारी महिला इतर मागास प्रवर्गातील व महाराष्ट्राची रहिवाशी असावी, त्यांचे वय १८ ते ६० वर्ष असावे.

बचत गटाची नोंदणी महिला विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्रात केलेली असावी, असे आवाहन महामंडळाच्या सहायक संचालकांनी केले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!