आपला जिल्हा अकोला

तेल्हारा येथील कै.किशोर भागवत यांच्या स्मरणार्थ 300 दप्तरांचे वाटप!

तेल्हारा येथील कै.किशोर भागवत यांच्या स्मरणार्थ 300 दप्तरांचे वाटप!

तेल्हारा येथील कै.किशोर भागवत यांच्या स्मरणार्थ 300 दप्तरांचे वाटप!

              अनेक वर्ष ज्ञान देण्याचे कार्य करणारे सेवाव्रती शिक्षक, कै. किशोर अनंतराव भागवत यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराच्या वतीने दिनांक ३० जून ते ०२ जुलै दरम्यान ग्रामीण भागातील विविध जिल्हा परिषद शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना ३०० दप्तरांचे वाटप करण्यात आले.

               शैक्षणिक क्षेत्रात २२ वर्ष कार्य करणारे सेवाव्रती शिक्षक कै. किशोर अनंतराव भागवत यांची प्रथम नियुक्ती जिल्ह्यातील बार्शीटाकळी पंचायत समितीत झाली होती. तदनंतर त्यांच्या मूळ तेल्हारा तालुक्यातील त्यांची पहिली नियुक्ती जिल्हा परिषद शाळा तळेगाव बाभूळगाव येथे झाली होती. तेथून त्यांच्या सेवापूर्ती पर्यंत त्यांनी विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये सेवा कार्य केले.अलीकडेच २० जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ दिनांक ३० जून ते ०२ जुलै दरम्यान ग्रामीण भागातील विविध जिल्हा परिषद शाळांच्या गरजू विद्यार्थ्यांना ३०० दप्तरांचे वाटप करण्यात आले.

त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने तेल्हारा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात प्रथम सेवा दिलेल्या तळेगाव बाभूळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप सुरू केले. यावेळी कुटुंब घटक प्रशांत भागवत, हेमंत भागवत यांच्या सह जिल्हा परिषद शाळा तळेगाव बाभुळगाव येथील मुख्याध्यापक अनिल बिहाडे, शिक्षक राहुल अवताडे, प्रवीण चोपडे सर, हरिदास तराळे सर, कुमारी योगिता पखान मॅडम, शाळा समिती अध्यक्ष उषाताई सुनील इंगळे, त्यांची यावेळी उपस्थितीत विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. 

तदनंतर त्यांनी स्थापन केलेली इंदिरा नगर येथील तत्कालीन जिल्हा परिषद व विद्यमान श्री संत संताजी जगनाडे महाराज नगरपरिषद शाळा, पिवंदळ बु||,निंबोळी, अकोली रूप, गाडेगांव, तुदगाव आणि वाकोडी अशा विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये भागवत परिवाराच्या वतीने दिनांक ३० जून ते ०२ जुलै दरम्यान विविध जिल्हा परिषद शाळेच्या गरजू विद्यार्थ्यांना ३०० दप्तरांचे वाटप करण्यात आले.

सामाजिक दायित्व –

शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्ष ज्ञान देण्याचे कार्य करणारे सेवाव्रती शिक्षक कै. किशोर अनंतराव भागवत यांनी शैक्षणिक क्षेत्रा सोबतच सामाजिक दायित्वाचाही वसा घेतलेला होता. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात ऐच्छिक सेवानिवृत्ती घेत सामाजिक कार्य करण्याचा ध्यास मनात ठेवून त्यातून त्यांनी तेल्हारा तालुक्यातील जनतेला सुविधा युक्त वास्तू मिळावी या हेतूने ज्या मंगल कार्यालयाची पायाभरणी केली.तालुक्यातील जनतेला मंगल कार्यांसाठी सुविधा पुरविण्याचा संकल्प करून तो अनंतराव भागवत मंगल कार्यालयाच्या रूपात सिद्ध केला.यावरच ते थांबले नाहीत, त्यांनी अनेकांना आर्थिक संकट असताना सुद्धा वैयक्तिक कार्यक्रमांसाठी, सामाजिक कार्यासाठी सदैव आपले मंगल कार्यालय जनतेसाठी खुले ठेवले, जनतेला सुविधा युक्त वास्तू मिळावी या हेतूने ज्या मंगल कार्यालयाची पायाभरणी केली. ती वास्तू आज हजारो लोकांच्या आनंद उत्सवाची साक्ष ठरत आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!