पर्यावरण वाचवण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत ‘एक विद्यार्थी – एक झाड’ अभियान राबवा; तहसीलदारांना निवेदन.
पर्यावरण वाचवण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत 'एक विद्यार्थी – एक झाड' अभियान राबवा; तहसीलदारांना निवेदन.
पर्यावरण वाचवण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत ‘एक विद्यार्थी – एक झाड’ अभियान राबवा; तहसीलदारांना निवेदन.

वाढते तापमान, अनियमित पाऊस, भूजल पातळीतील घट आणि दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला असून, भविष्यातील संकट टाळण्यासाठी तेल्हारा तालुक्यात व्यापक जनजागृती व वृक्षसंवर्धनाची गरज असल्याचे निवेदन प्रहार संघटनेचे अकोला जिल्हा महासचिव तथा छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक राजेश पाटील खारोडे यांनी तेल्हारा तहसीलदार महेश रामगुंडे यांच्या कडे सादर केले.
निवेदनात तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्थांमध्ये “झाडे लावा – झाडे जगवा” अभियान प्रभावीपणे राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच “एक विद्यार्थी – एक झाड, एक नागरिक – एक झाड” हा संकल्प प्रत्येकाने स्वीकारून लावलेल्या झाडांचे संगोपन करण्यावर भर देण्यात यावा तसेच प्रत्येक शाळा व महाविद्यालयात सक्तीचे वृक्षारोपण करून लावलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र समित्या स्थापन करणे, पर्यावरण जनजागृती रॅली, व्याख्याने, वृक्षदिंडी आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे. आज झाडे वाचवली तरच उद्याचे जीवन सुरक्षित राहील. केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर प्रत्येक रोप जगविण्याची जबाबदारीही समाजाने स्वीकारली पाहिजे. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून प्रशासन, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांनी संयुक्तपणे पुढाकार घेणे आवश्यक आहे.
तहसील प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तालुक्यात व्यापक पर्यावरण संवर्धन अभियान तातडीने राबवावे अशी अपेक्षा निवेदनातून राजेश खारोडे यांनी व्यक्त केली आहे.