आपला जिल्हा अकोलाधार्मिक

बेलखेड चे शेख नजीर कुरेशी दांपत्य पवित्र उमराहसाठी मक्का-मदिना रवाना,सर्वधर्मीय ग्रामस्थांनी केले स्वागत.

बेलखेड चे शेख नजीर कुरेशी दांपत्य पवित्र उमराहसाठी मक्का-मदिना रवाना,सर्वधर्मीय ग्रामस्थांनी केले स्वागत.

बेलखेड चे शेख नजीर कुरेशी दांपत्य पवित्र उमराहसाठी मक्का-मदिना रवाना,सर्वधर्मीय ग्रामस्थांनी केले स्वागत.

तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील मंडप डेकोरेशन व्यावसायिक शेख नजीर कुरेशी व सौ. शहिदा बी शेख नजीर कुरेशी हे पवित्र उमराह यात्रेसाठी मक्का-मदिना येथे जाण्यासाठी निघते वेळी बेलखेड येथील सर्वधर्मीय बांधवांनी त्यांचे स्वागत करून या पवित्र प्रवासानिमित्त शुभकामना दिल्या.

उमराह यात्रेसाठी मक्का मदीना जाण्यापूर्वी त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी दांपत्याचा पुष्पहार व गुलाबपुष्पांनी सत्कार करून त्यांच्या पवित्र यात्रेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच अल्लाहकडे त्यांचा उमराह कबूल होवो, अशी मनोभावे दुआ केली. यावेळी अचलपूर येथील पत्रकार सय्यद गनी यांनी विशेष उपस्थित राहून शेख नजीर कुरेशी दांपत्याची गुलपोशी केली.

यावेळी बेलखेड येथील भाजपा तालुका उपाध्यक्ष रफीक कुरेशी, सामाजिक कार्यकते अब्दुल लाईक सेठ,मौलवी मूसा मजाहिरी, साजिद कुरेशी,फारूक कुरेशी, शाहिद कुरेशी,शेख अल्तमश,शेख शोएब,देवीदास नागपुरे, राजु शिरेकार,अंबादास भटकर इत्यादी सह गावातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यात्री मुक्करमा येथे पवित्र काबा शरीफची आराधना करतात तसेच अल्लाहची विशेष इबादत करून आपल्या जीवनातील चुका माफ व्हाव्यात, समाजात शांतता नांदावी आणि सर्वांना सुख-समृद्धी लाभावी यासाठी प्रार्थना करतात. त्यामुळे प्रत्येक मुस्लिम बांधवासाठी उमराहचे विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. शेख नजीर कुरेशी दांपत्याच्या या पवित्र यात्रेनिमित्त बेलखेड गावात धार्मिक उत्साहाचे वातावरण दिसून आले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!