आपला जिल्हा अकोलाआपली शेती-माती

अकोला जिल्ह्यात मुबलक युरिया खत उपलब्ध -डॉ तुषार जाधव कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, अकोला

अकोला जिल्ह्यात मुबलक युरिया खत उपलब्ध -डॉ तुषार जाधव कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, अकोला

अकोला जिल्ह्यात मुबलक युरिया खत उपलब्ध -डॉ तुषार जाधव कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, अकोला

अकोला जिल्ह्यात आज अखेर एप्रिल ते जून या कालावधीत युरिया खत मंजूर आवंटन १४१२२ मे टन असून आत्तापर्यंत १२६७२ मे टन म्हणजेच ९०% युरिया खत पुरवठा झाला आहे.तसेच आज रोजी नर्मदा बायोकेम या कंपनीची १३०० मे टन युरिया खताची रेक जिल्ह्यात दाखल झाली असून त्याचे ही वाटप सुरू आहे.

गुरुवार दिनांक १७ जून २०२६ पर्यंत आयपीएल कंपनीची १२०० मे टन व चंबल कंपनीची ९०० मे टन असे एकूण २१०० मे टन युरिया खत उपलब्ध होणार आहे.आज रोजी जिल्ह्यात ४८६२ मे टन युरिया खत उपलब्ध आहे. सर्व शेतकऱ्यांना त्याचे वाटप सुरळीतपणे सुरू आहे. 

मुबलक प्रमाणात खत उपलब्ध असून भविष्यातही खत निरंतर पणे उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवाना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करावे.गर्दी तसेच जास्तीची खत खरेदी करणे टाळावे असे आवाहन डॉ तुषार जाधव कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, अकोला यांनी केले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!