एल-निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा.,उपलब्धता सुनिश्चित बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्याचे आदेश.
एकनाथ डवले प्रधान सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य यांचे तातडीचे पत्र.
एल-निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा.,उपलब्धता सुनिश्चित बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्याचे आदेश.
एकनाथ डवले प्रधान सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य यांचे तातडीचे पत्र.

भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावर्षी एल-निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता असून त्यामुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील विविध धरणे, जलाशय व इतर जलस्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता पिण्याच्या पाण्याच्या गरजांना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने यापुर्वीच संदर्भ 4 व 5 अन्वये सुचना देन्यात आलेल्या आहेत. भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने काही निर्देश देण्यात येत आहेत त्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी व संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील धरणे व जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घ्यावा, धरणांमधून सिंचनासाठी प्रस्तावित किंवा सुरू असलेली पाणी आवर्तने तात्काळ बंद करण्यात यावी, अत्यावश्यक परिस्थिती वगळता पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जलसाठ्याचा वापर इतर कोणत्याही कारणासाठी करण्यात येऊ नये,दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सर्व शहरी व ग्रामीण भागात अखंडित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल यासाठी धरणामध्ये आवश्यक तो पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे. तो जपून वापरण्याबाबत जिल्हास्तरावर कृती आराखडा तयार करावा,स्थानिक स्वराज्य संस्था, पाणीपुरवठा विभाग व जलसंपदा विभाग यांच्यात प्रभावी समन्वय ठेवून परिस्थितीचा नियमित आढावा घ्यावा, धरणे, कालवे, नद्या, तलाव व इतर जलस्रोतांमधून होणारा अनधिकृत व बेकायदेशीर पाणी उपसा तात्काळ थांबविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, संबंधित महसूल, पोलीस व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकांमार्फत नियमित तपासणी व गस्त आयोजित करावी. अनधिकृत मोटारी, पाईपलाईन, पंप व इतर साधनसामग्री बाबत शासन निर्णय, दि.१२.१२.२०१८ अन्वये संबंधितांवर कडक कारवाई करावी.,पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सिंचन आवर्तने स्थगित करण्याबाबतची कार्यवाही व बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल प्रत्येक आठवड्याला शासनास सादर करावा अशा निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करावी. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी असे पत्र प्रधान सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य एकनाथ डवले यांच्या स्वाक्षरी सह सर्व विभागातील अधिकारी यांना काढण्यात आले आहेत.