आपला जिल्हा अकोला

तेल्हारा राठोड तेली समाज गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.

तेल्हारा राठोड तेली समाज गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.

तेल्हारा राठोड तेली समाज गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.

नुकताच राठोड तेली समाज पंच मंडळ तेल्हारा द्वारा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील दहावी व बारावी मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार सोहळा, बुधवार दि. १०/०६/२०२६ रोजी संध्या. ५ ते ८ दरम्यान भागवत मंगल कार्यालय येथे अतिशय उत्साहात सुंदररित्या संपन्न झाला.

यामध्ये मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून अकोला महानगरपालिकेचे स्वीकृत सदस्य ॲड.देवाशिष काकड व मार्गदर्शक अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक शाखा तेल्हाराचे संचालक डॉ.महेश बोबडे तर अध्यक्षस्थानी समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष शेखर भुजबले तसेच उपाध्यक्ष निवृत्ती अकोटकार, सचिव तथा विविध कार्यकारी सोसायटीचे सभापती सतीश चहाजगुणे, तेल्हारा नगरपालिकेच्या नगरसेविका सौ.साक्षी वानखडे(पांडव) व सौ.संध्याताई गावत्रे, दानापूरचे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुरेश खोडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व समाजाचे आराध्य दैवत श्री.संताजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली, प्रास्ताविकामध्ये डॉ.सुधीर भुजबले यांनी समाजाची कार्यक्रमाबद्दलची भूमिका मांडली. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पार पडला. तसेच मिलिटरी मध्ये सेवा देऊन निवृत्त झालेले विजय वासनकार यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अनिल पोहणे, माजी अध्यक्ष अरुण अकोटकार, गोपाल भुजबले, गंगाधर खोडे, विठ्ठलराव वानखडे, मुख्याध्यापिका सौ.सुरेखाताई भुजबले, सौ.विजयाताई वानखडे, प्रशांत भागवत, सौ.पुष्पाताई खोडे, सौ.माधुरीताई चहाजगुणे, वामनराव वानखडे, अशोक पोहणे, वासुदेवराव गोदे, किसनराव भुजबले, शिवराज जामोदे, प्रा. श्रीकृष्ण फंदाट, सदानंद धनभर, सौ.सरिता वासनकर, सौ.मोनिकाताई साकरकर, भाजपा नेते मयुर चहाजगुणे, कैलास अरुळकार, डॉ.महेश साकरकार, रमेश भुजबले आदि भरपूर समाज बांधवांनी उपस्थित राहुन यशस्वीतेकरिता सर्वांनी छान सहकार्य केले. संचालन अमित काकड तर आभारप्रदर्शन सतीश चहाजगुणे यांनी केले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!