कृषी धोरणावर विचारमंथनासाठी प्रकाश पोहरे ह्यांनी अकोल्यात आयोजन केले सिफाचे राष्ट्रीय चर्च्या सत्र
कृषी धोरणावर विचारमंथनासाठी प्रकाश पोहरे ह्यांनी अकोल्यात आयोजन केले सिफाचे राष्ट्रीय चर्च्या सत्र
कृषी धोरणावर विचारमंथनासाठी प्रकाश पोहरे ह्यांनी अकोल्यात आयोजन केले सिफाचे राष्ट्रीय चर्च्या सत्र

अकोला, दि. १२ : देशातील कृषी धोरणावर विचारमंथन करून केंद्र सरकारसमोर ठोस उपाययोजना मांडण्यासाठी भारतीय किसान संघ परिसंघ (सिफा) यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील बैठकीचे आयोजन अकोल्यात करण्यात आले आहे. ही बैठक १४ व १५ जून २०२६ रोजी अकोल्यातील कान्हेरी येथील पोहरे फार्म येथे होणार आहे. विविध राज्यांतील सिफाचे पदाधिकारी, कृषी शास्त्रज्ञ, विचारवंत आणि अभ्यासक या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
भारतीय किसान संघ परिसंघाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी कृषी मूल्य आयोगाच्या ३ बैठकांना हजेरी लावून आपल्या कार्याची चुणूक राष्ट्रीय स्तरावर दाखवून दिली असून, त्याचाच एक भाग म्हणून अकोल्यात ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न, बाजारपेठ, उद्योग-कारखानदारी, पर्यावरण, जलस्रोत, तसेच सरकारी धोरणांमुळे संकटात आलेली शेती व वाढती बेरोजगारी या विषयांवर देशभरातील विचारवंत आपले मनोगत व्यक्त करणार आहेत.
शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी हमीभावासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली जनहित याचिका तसेच कृषी मूल्य आयोगाच्या हमीभाव धोरणावर साधलेला निशाणा देशभरात लक्षवेधी ठरला आहे. आपल्या कार्याच्या धडाक्यामुळे प्रकाश पोहरे यांनी देशातील शेतकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.