आपला जिल्हा अकोलाआपली शेती-माती

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बेलखेड येथील कबड्डी चमुनी केले मिशन प्लॅनटेशन समुह संघटन.

गावात ठिक ठिकाणी वृक्षारोपण व संवर्धन करण्याची घेतली शपथ.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बेलखेड येथील कबड्डी चमुनी केले मिशन प्लॅनटेशन समुह संघटन.

गावात ठिक ठिकाणी वृक्षारोपण व संवर्धन करण्याची घेतली शपथ.


तेल्हारा दि.
तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील कबड्डी संघाचे खेळाडू आपल्या खेळ कौशल्याने नावाजलेले आहेत. गावात कबड्डी खेळाडूंची संख्या मोठी आहे. या संघटना चा फायदा गावच्या व राष्ट्रीय कार्यासाठी व्हावा असा विचार युवकांच्या मनात आला व ठरले मिशन प्लॅनटेशन समुह संघटन. या माध्यमातून गावातील मोकळ्या जागेत व रस्त्याचे दुतर्फा वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याची शपथ या युवकांनी घेतली.

चांगल्या कार्याचा सुरूवात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गावात वृक्षारोपण केले. बेलखेड गावात श्री गजानन महाराज मंदीर ते राधास्वामी सत्संग पर्यंत च्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा वृक्ष लागवड व मधात असलेल्या डिव्हाडर मध्ये शोभिवंत फुल झाडे लावण्याचा पुढाकार युवकांनी घेतला आहे. पर्यावरण दिनी काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर वृक्षारोपण करून सुरूवात करण्यात आली.

यावेळी जुनेद शाह, प्रशांत डिगे, निखिल खुमकर, रोहित नागपूरे, संतोष चोपडे, ज्ञानेश्वर इंगळे, मयुर गोमासे, मयुर उमाळे, तुषार गोमासे, भावेश राखोंडे, अंकीत वानखडे, मनिष मनिष गोमासे, विनीत परमाळे, दिप नागपूरे, रोहित राऊत, गौरव इंगळे, राहुल राऊत, प्रणव खुमकर यांनी वृक्षारोपण करून संवर्धनाची शपथ घेतली. पुढील टप्प्यात मृगाचे पाणी आल्यानंतर संपूर्ण गावात, स्मशान भूमी परिसर,बेलखेड अकोली रस्ता, आस नदी परिसरात वृक्षारोपण करण्याची तयारी युवकांनी केली आहे. या समाजपयोगी कार्यात गावकरी व प्रशासनाने सहकार्य करावे अशी मागणी या निमित्ताने युवकांनी केली आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!