आपला जिल्हा अकोलाआपली शेती-माती

अकोला जिल्ह्यात येत्या पाच दिवसांत ७,१०१ मे.टन युरिया खत उपलब्ध होणार., डॉ तुषार जाधव, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला यांची माहिती

अकोला जिल्ह्यात येत्या पाच दिवसांत ७,१०१ मे.टन युरिया खत उपलब्ध होणार., डॉ तुषार जाधव, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला यांची माहिती

अकोला जिल्ह्यात येत्या पाच दिवसांत ७,१०१ मे.टन युरिया खत उपलब्ध होणार., डॉ तुषार जाधव, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला यांची माहिती. 

अकोला : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनामार्फत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यानुसार येत्या पाच दिवसांत जिल्ह्यासाठी एकूण ७,१०१ मे.टन युरिया खत उपलब्ध होणार आहे.

यामध्ये एनएफएल कंपनीचा १,९७६ मे.टन, आरसीएफ कंपनीचा २,६०० मे.टन तसेच संरक्षित खत साठा (बफर स्टॉक) २,४५० मे.टनपैकी १,२२५ मे.टन असा एकूण ५,८०१ मे.टन युरिया खताचा साठा येत्या तीन दिवसांत जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. तसेच त्यानंतर नर्मदा बायो केम कंपनीचा १,३०० मे.टन युरिया खत साठा देखील जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी मोठ्या प्रमाणात युरिया खत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जिल्ह्यास मंजूर असलेल्या आवंटनानुसार आवश्यक खतसाठा वेळेत उपलब्ध व्हावा यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी युरिया खताच्या उपलब्धतेबाबत चिंता न करता आवश्यकतेनुसारच खत खरेदी करावे. जास्तीचे अथवा आगाऊ खत खरेदी करणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे – डॉ तुषार जाधव, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!