आपला जिल्हा अकोलाधार्मिक

तेल्हारा शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहाने साजरी. 

तेल्हारा शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहाने साजरी. 

तेल्हारा शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहाने साजरी.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीच्या वतीने तिसऱ्या वर्षी मोठ्या हर्षोल्हासात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सकाळ पासूनच अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या पूजनासाठी समाज बांधवांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर सायंकाळी समाज बांधव व नागरिकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. 

विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीने टाळ-मृदंगाच्या गजरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत अहिल्यादेवींच्या वेशभूषेत वनश्री शिवहरी बाहे, म्हाळसा म्हणून वैष्णवी बाजोड, बानुबाई म्हणून ईश्वरी मार्तंड घुले, तर देव खंडेराया यांच्या भूमिकेत ओम गव्हाळे सहभागी झाले होते. तसेच जय गजानन भजनी मंडळ सातरगाव व योगेश्वर महिला भजनी मंडळ तेल्हारा यांनी भजन-कीर्तनाद्वारे वातावरण भक्तिमय केले.

सदर मिरवणूक माहेश्वरी भवन, तेल्हारा येथून सुरू होण्यापूर्वी धनगर समाज बांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले. तसेच नगरपरिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवकांनीही पूजन करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव लाखे, कार्याध्यक्ष शुभम नवलकार तसेच मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.

ठिकठिकाणी या शोभायात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तसेच नागरिकांसाठी थंड पाणी, शरबत व चहाची व्यवस्था करण्यात आली होती. तानाजी मंडळ, मोचीपुरा मार्गे, पोलीस स्टेशन समोर, टॉवर चौक, जगद्गुरु संत तुकाराम महाराज चौक मार्गे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,माॅ जिजाऊ उद्यानापर्यंत ही भव्य-दिव्य शोभायात्रा पार पडली. शेवट पुण्यश्लोक होळकर यांच्या आरतीने करण्यात आला.

या जयंती सोहळ्यात हजारो धनगर समाज बांधव तसेच पुण्यश्लोक अहिल्या माता होळकर शोभायात्रा समिती तथा तेल्हारा तालुका धनगर समाज संघटना यांनी कार्यक्रम यशस्वी करिता अथक परिश्रम घेतले.अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी तेल्हारा पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात मदत केली.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!