आपला जिल्हा अकोलानिवडणुक

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नियमांचे काटेकोर पालन व्हावे – राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

नगरपरिषद तसेच आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण निवडणूक यंत्रणा सक्षम, सज्ज आणि सतर्क ठेवा. 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नियमांचे काटेकोर पालन व्हावे – राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

नगरपरिषद तसेच आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण निवडणूक यंत्रणा सक्षम, सज्ज आणि सतर्क ठेवा. 

अकोला, दि. ४ : पातूर नगरपरिषद तसेच आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण निवडणूक यंत्रणा सक्षम, सज्ज आणि सतर्क ठेवावी. प्रत्येक नियमाचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक आहे, असे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले.

जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक तयारी व आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा त्यांनी घेतला. यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, न. प. प्रशासन सहआयुक्त विश्वनाथ वडजे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पातूर व अकोट नगरपरिषद निवडणुकांच्या अनुषंगाने मतदान केंद्रांची तयारी, मनुष्यबळाचे नियोजन, तसेच आवश्यक साधनसामग्री यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

आगामी ग्रामपंचायत व इतर निवडणुकांसाठी आरक्षण सोडत, प्रशिक्षण प्रक्रिया आणि यंत्रणा अधिक सक्षम करण्यावरही विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आले.

दरम्यान, आयुक्तांनी पातूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन मतदान केंद्रे व स्ट्रॉंगरूमची पाहणी केली. न. प. मराठी शाळा क्र. १ येथील मतदान केंद्राला त्यांनी दिली. पातूर येथे त्यांनी मतदान कर्मचाऱ्यांशी संवाद साधला व निवडणूक प्रक्रियेतील बारकावे समजावून सांगितले.

निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडता कामा नये. आचारसंहितेचे काटेकोर पालन करून निवडणुका शांततापूर्ण, पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडाव्यात, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्तांनी दिले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!