जनगणना २०२७’च्या प्रत्यक्ष टप्प्याअंतर्गत १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरांची होणार नोंदणी.
जनगणना २०२७'च्या प्रत्यक्ष टप्प्याअंतर्गत १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरांची होणार नोंदणी.,तेल्हारा तहसीलदार महेश रामगुंडे यांची माहिती.
जनगणना २०२७’च्या प्रत्यक्ष टप्प्याअंतर्गत १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरांची होणार नोंदणी.

‘जनगणना २०२७’च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत स्व जनगणना १५ मे पर्यंत झाली त्यामध्ये ज्यांनी स्व गणना नोंदणी केली त्यांना नोदणी नंबर येणाऱ्या अधिकृत प्रगणक यांना दाखवून पुढील टप्पा प्रगणक यांच्या व्दारे करायचा आहे त्यावेळी त्यांना सहकार्य करून माहिती द्यायची आहे. ज्यांची स्व गणना झाली नाही त्यांनी प्रगणक यांच्या कडे माहिती द्यावी. प्रगणक हे १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरांची नोंदणी करतील. त्यासाठी आपल्याकडे येणारे प्रगणक (‘प्रगती’ आणि ‘विकास’) यांना योग्य ती माहिती द्यावी लागेल. ते नेमके कोणते प्रश्न विचारणार आहे, याची संपूर्ण यादी जाणून घ्यावी व येणाऱ्या प्रगणकांना माहिती पुरवावी असे तेल्हारा तहसीलदार महेश रामगुंडे यांनी कळविले आहे.
