मुख्याध्यापक सचिन ठोंबरे ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित.,शिर्डीत शानदार सोहळा; महाराष्ट्र शिक्षक पॅनेलचा उपक्रम.
मुख्याध्यापक सचिन ठोंबरे 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक' पुरस्काराने सन्मानित.,शिर्डीत शानदार सोहळा; महाराष्ट्र शिक्षक पॅनेलचा उपक्रम.
मुख्याध्यापक सचिन ठोंबरे ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित.,शिर्डीत शानदार सोहळा; महाराष्ट्र शिक्षक पॅनेलचा उपक्रम.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे आणि शैक्षणिक कार्यात सकारात्मक बदल घडवून आणणारे, जिल्हा परिषद केद्रीय शाळा माळेगाव (बाजार) येथील मुख्याध्यापक सचिन ठोंबरे यांना यावर्षीचा ‘आदर्श शिक्षक सेवा सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शिक्षक पॅनेल (एमएसपी) च्या वतीने १२ मे रोजी शिर्डी येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात हा गौरव करण्यात आला.
हा मानाचा पुरस्कार सचिन ठोंबरे यांनी आपल्या पत्नीसह (सपत्नीक) मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याला गती देणे, शाळेत विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करणे आणि गुणवत्तेत वाढ करणे, या कार्याची दखल घेऊन शिक्षक फाउंडेशन महाराष्ट्र व निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भार्गवी चिरमुले सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, रोहित शिंगे प्रसिद्ध कवी, दीपक चामे अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक पॅनेल,भास्कर डोसे राज्य समन्वयक, श्रीमती गुंजन पाटील इत्यादी मान्यवर अतिथी उपस्थित होते.
तसेच ओमप्रकाश उगले, श्याम पाठक, भास्कर डोसे सर, अनिल धनबर, मनोहर खंडेराव, हरिहर मानकर (जिल्हा समन्वयक) यांच्यासह राज्यातील शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबवलेल्या उपक्रमांची पावती म्हणजे हा पुरस्कार आहे. यामुळे भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली. — सचिन ठोंबरे (पुरस्कार विजेते मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्र शाळा माळेगाव बाजार)