नागपूर- मडगाव विशेष गाडीचे नियमितीकरण; आता एक्सप्रेस गाडी म्हणून धावणार., नागरिकांनी लाभ घ्यावा – खासदार अनुप धोत्रे
नागपूर- मडगाव विशेष गाडीचे नियमितीकरण; आता एक्सप्रेस गाडी म्हणून धावणार., नागरिकांनी लाभ घ्यावा - खासदार अनुप धोत्रे
नागपूर- मडगाव विशेष गाडीचे नियमितीकरण; आता एक्सप्रेस गाडी म्हणून धावणार., नागरिकांनी लाभ घ्यावा – खासदार अनुप धोत्रे

विदर्भ तसेच कोकण/गोवा भागांमधील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने रेल्वे मंत्रालयाने नागपूर- मडगाव दरम्यान चालणाऱ्या विशेष गाडीच्या नियमितीकरणास मान्यता दिली आहे. या निर्णयाचे खासदार अनुप धोत्रे यांनी मध्य रेल्वे तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
गाडी क्रमांक 01139/01140 नागपूर- मडगाव TOD विशेष, जी आतापर्यंत मागणीनुसार चालविण्यात येत होती, ती आता नियमित करून नवीन क्रमांक 11203/11204 नागपूर- मडगाव एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. कोकण गोवा विदर्भ प्रवाशांना यामुळे अधिक सोयीस्कर, विश्वासार्ह आणि नियमित सेवा उपलब्ध होणार आहे.
ही नव्याने नियमित करण्यात आलेली द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस सेवा पुढीलप्रमाणे चालविण्यात येईल-
*11203 नागपुर-मडगांव एक्सप्रेस* नागपूर येथून सुटेल 15:05 वा. (बुधवार व शनिवार) मडगाव येथे आगमन: 17:45 वा. (गुरुवार व रविवार)
*11204 मडगाव-नागपूर एक्सप्रेस* मडगाव येथून सुटेल: 20:00 वा. (गुरुवार व रविवार) नागपूर येथे आगमन: 21:30 वा. (शुक्रवार व सोमवार)
थांबे: – वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल, ज्यामुळे विविध भागांमधील संपर्क अधिक मजबूत होईल.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, या सेवेच्या नियमितीकरणामुळे प्रवाशांना विश्वासार्ह प्रवास पर्याय उपलब्ध होईल तसेच पर्यटन आणि स्थानिक आर्थिक घडामोडींनाही चालना मिळेल.प्रवाशांनी अद्ययावत वेळापत्रक तपासून आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन खासदार अनुप धोत्रे व रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.