अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या विविध पुरस्कारांची मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांनी दिली माहिती.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या विविध पुरस्कारांची मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांनी दिली माहिती.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या विविध पुरस्कारांची मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांनी दिली माहिती.

मुंबई/प्रतिनिधी – पत्रकारितेच्या क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या पत्रकारांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने विविध पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येते..हा पुरस्कार वितरण सोहळा लवकरच मुंबईत होत आहे.. पुरस्कार्थींची निवड प्रकिया सुरू आहे..
दिल्या जात असलेल्या पुरस्कारांमध्ये –
1) आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार (25,000 रूपयांचा हा पुरस्कार परिषदेच्या वतीने दिला जातो)
2) आचार्य अत्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कार
3) स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख कृषी पत्रकारिता पुरस्कार
4) पत्रमहर्षी बाबुराव पराडकर स्मृती पुरस्कार (हा पुरस्कार यावर्षीपासून हिंदी भाषक पत्रकारांसाठी सुरू करण्यात येत आहे..)
5) प्रमोद भागवत स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार (मिसेस भागवत यांनी परिषदेकडे ठेवलेल्या 1 लाख रूपयाच्या ठेवीतून हा पुरस्कार दिला जातो)
6) दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार (कोकणातील पत्रकारांसाठीचा हा पुरस्कार सुनील तटकरे यांनी परिषदेकडे ठेवलेल्या 1 लाख रूपयाच्या ठेवीतून दिला जातो.)
7)नागोरावजी दुधगावकर स्मृती पुरस्कार (दुधगावकर कुटुंबियांनी परिषदेकडे ठेवलेल्या एक लाख रूपयांच्या ठेवीतून मराठवाड्यातील पत्रकारांना हा पुरस्कार दिला जातो)
8)ज्येष्ठ पत्रकार भगवंतराव इंगळे स्मृती पत्रकारिता पुरस्कार (इंगळे कुटुंबियांनी परिषदेकडे ठेवलेल्या एक लाख रूपयांच्या ठेवीतून विदर्भातील पत्रकारांना हा पुरस्कार दिला जातो)
9)ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. साथी मनोहरपंत चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार (मंगेश चिवटे यांनी परिषदेकडे ठेवलेल्या एक लाख रूपये ठेवीतून हा पुरस्कार दिला जातो)
10) सावित्रीबाई फुले स्मृती महिला पत्रकार पुरस्कार
11) रामशेठ ठाकूर सामाजिक सेवा गौरव पुरस्कार
(माजी खासदार श्री. रामशेठ ठाकूर यांनी परिषदेकडे ठेवलेल्या ठेवीतून एका सामाजिक कार्यकर्त्यांसाठी हा पुरस्कार यावर्षी पासून दिला जाणार आहे..) अशी माहिती अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांनी दिली माहिती आहे.