बेलखेड येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व हरिकीर्तन महोत्सव.,नामांकित कीर्तनकारांची किर्तन सेवा.
श्री जानगीर महाराज दरबार मढी संस्थान, विठ्ठल रुक्मिणी मंदीर बेलखेड चा उपक्रम
- बेलखेड येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व हरिकीर्तन महोत्सव.,नामांकित कीर्तनकारांची किर्तन सेवा.
श्री जानगीर महाराज दरबार मढी संस्थान, विठ्ठल रुक्मिणी मंदीर बेलखेड चा उपक्रम.

तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील श्री जानगीर महाराज दरबार मढी संस्थान, विठ्ठल रुक्मिणी मंदीर बेलखेड येथे अखंड हरिनाम सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व हरिकीर्तन महोत्सव गुरूवार दिनांक 7 मे पासून सुरू होणार असून समारोप गुरूवार दि. 14 मे 2026 ला भव्य महाप्रसादाने होणार आहे.

तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील श्री जानगीर महाराज दरबार मढी संस्थान, विठ्ठल रुक्मिणी मंदीर येथे गुरूवार दिनांक 7 मे पासून सुरू होणारा अखंड हरिनाम सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व हरिकीर्तन महोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम सह सप्ताह साजरा केला जाणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार सेवा देणार आहेत यामध्ये पहिली सेवा दि. 7 मे रोज गुरूवारी बेलखेड ची कन्या ह. भ. प. कु. नम्रता ताई नरेंद्र खुमकर आपल्या जन्म भूमीत किर्तन सेवा देणार आहेत त्याच प्रमाणे दि. 8 ला सखारामपूर संस्थानचे समाजप्रबोधन किर्तनकार हरिओम महाराज वाकोडे, दि. 9 ला कौंडिण्यपूर येथील भागवताचार्य संजय महाराज ठाकरे, दि. 10 ला विनोदाचार्य अरूण महाराज लांडे, दि. 11 ला आळंदीकर भागवताचार्य अतुल महाराज गायकी, दि. 12 ला धाराशिव चे समाजप्रबोधन किर्तनकार संभाजी महाराज दि. 13 ला मोर्शी चे नारायण महाराज पडोळे, दि 14 ला त्र्यंबक महाराज आवारे यांचे काल्याचे कीर्तन व भव्य महाप्रसादाने समारोप राहील.

सप्ताह दरम्यान दररोज पहाटे काकडा, सकाळी 9 ते 12 व दुपारी 3 ते 5 श्री ज्ञानेश्वरी पारायण व संध्याकाळी हरिपाठ, रात्री 8 ते 10 हरिकीर्तन होणार आहे.
श्री ज्ञानेश्वरी पारायण वाचक म्हणून रमेश महाराज पळसकर राहतील तसेच गायनाचार्य व सोहळा मार्गदर्शक ह. भ. प. गजानन महाराज खोंड, कोंडीराम महाराज, मृदुंगाचार्य जगन्नाथ महाराज हाडोळे, योगेश महाराज नागरगोजे राहतील. सप्ताह दरम्यान सप्ताह मार्गदर्शक रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांची भेट राहील. दरम्यान दररोज संत पंगती सेवा विविध मान्यवरांच्या हस्ते दिली जाईल. धार्मिक कार्यक्रम बरोबरच संस्थानचे वतीने गत विस वर्षापासून सामाजिक उपक्रम मध्ये आरोग्य शिबीर, सामान्य ज्ञान परिक्षा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम घेतले जातात त्यामध्ये प्रा विकास रामटेके यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इयत्ता ५ ते १० पर्यंत विद्यार्थी करिता सामान्य ज्ञान परीक्षा व विविध आजार आरोग्य शिबीर घेतले जाईल. तरी ग्रामस्थ बेलखेड व पंचक्रोशीतील भावीक भक्तांनी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम चा लाभ घ्यावा असे आवाहन श्री जानगीर महाराज दरबार मळी संस्थान बेलखेड व ग्रामस्थ बेलखेड यांनी केले आहे.
