आपला जिल्हा अकोला

सेठ बन्सीधर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, तेल्हारा चा निकाल शंभर💯 टक्के.,यशाची परंपरा कायम!

180 पैकी 180 विद्यार्थी उत्तीर्ण ,37 प्राविण्य श्रेणीत, सात्विक मानकर प्रथम. 

सेठ बन्सीधर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, तेल्हारा चा निकाल शंभर💯 टक्के.,यशाची परंपरा कायम!

180 पैकी 180 विद्यार्थी उत्तीर्ण ,37 प्राविण्य श्रेणीत, सात्विक मानकर प्रथम. 

तेल्हारा येथील सेठ बन्सीधर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप उमटवत 100 टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. दिनांक 2 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालामध्ये महाविद्यालयाने अभिमानास्पद यश संपादन केले आहे.

या परीक्षेसाठी एकूण 180 विद्यार्थी बसले होते आणि विशेष म्हणजे सर्वच्या सर्व 180 विद्यार्थी उत्तीर्ण ठरले आहेत. यामध्ये 37 विद्यार्थ्यांनी प्राविण्यश्रेणी मिळवली असून 89 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर 52 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

गुणानुक्रमात सात्विक शरद मानकर याने 88.83% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कोमल ज्ञानदेव कतोरे (88.17%) हिने द्वितीय, अक्षदा संदीप खुमकर (88.00%) हिने तृतीय, पार्थ विलास यादगिरे (87.67%) याने चतुर्थ तर अनमोल जगदीश घायसुंदर (85.50%) याने पाचवा क्रमांक मिळवला.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गोपालदास मल्ल, उपाध्यक्ष बेनीप्रसाद झुनझुनवाला, व्यवस्थापक राजेंद्र शाह तसेच संचालक मंडळातील विठ्ठल खारोडे, डॉ. विक्रम जोशी, अभिजीत शाह, विष्णू मल्ल, अश्विनी खारोडे, शिवम वाडिया, पुष्कर तागडे, ओमप्रकाश झुनझुनवाला यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

तसेच प्राचार्य गोपाल फाफट, उपप्राचार्य प्रदीप वाघ, पर्यवेक्षक राजेंद्र कोरडे, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!