महाराष्ट्र

दारोदार भटकणाऱ्या भाट समाजाने जपलेला ठेवा दुर्लक्षित. ,भाट समाजाने जपलेल्या पोथी, वंशावळी ला शासन मान्यता मिळावी अशी मागणी.

दारोदार भटकणाऱ्या भाट समाजाने जपलेला ठेवा दुर्लक्षित. ,भाट समाजाने जपलेल्या पोथी, वंशावळी ला शासन मान्यता मिळावी अशी मागणी.

दारोदार भटकणाऱ्या भाट समाजाने जपलेला ठेवा दुर्लक्षित. ,भाट समाजाने जपलेल्या पोथी, वंशावळी ला शासन मान्यता मिळावी अशी मागणी.

हजारो वर्षांचे पूर्वज वंशावळी दप्तराची नोंद ठेवून दारोदार भटकणाऱ्या भाट समाजाने जपलेला ठेवा दुर्लक्षित असल्याने या भाट समाजाने जपलेल्या पोथी, वंशावळी ला शासन मान्यता मिळावी अशी मागणी होत आहे.

भाट, हेळवी या समुदाय विषयी मोठा पौराणिक इतिहास आहे“भाट” म्हणजे राजा किंवा प्रतिष्ठित व्यक्तीची स्तुती करणारे, त्यांचे गुणगान करणारे व्यक्ती किंवा ऐतिहासिक कथा, वंशावळी सांगणारे व्यक्ती होत. 

पूर्वी भाट हे राजाश्रित असत आणि राजाचे पराक्रम, दानशक्ती, इत्यादींचे वर्णन करणारे काव्य किंवा गद्य साहित्य तयार करत तर काही ठिकाणी भाट हे घराण्यांच्या वंशावळी, इतिहास आणि परंपरा जतन करण्याचे काम करत तीच परंपरा आजही काही ठिकाणी भाट ही जात जपून आहे. हि जात भाट व्यवसाय म्हणून ओळखली जाते परंतु ऐतिहासिक माहिती, कथा, आणि वंशावळी जपण्याचे काम ते आजही करित आहेत लोकांच्या दारोदारी फिरून माहिती देवून जे मिळेल त्यावर हा समाज आपला उदरनिर्वाह भागवत आहे. 

“भाट” या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे “राजाची स्तुती करणारा” आणि दुसरा म्हणजे “वंशावळ जपणारा”…. 

भाट आणि हेळवी हे दोन्ही ऐतिहासिक कथा आणि परंपरा जतन करणारे असले तरी, भाट हे मुख्यत्वे राजाश्रित होते आणि हेळवी हे कथाकथन करणारे आणि इतिहासाची माहिती देणारे होते परंतु आता हे दोन्ही घटक आज दुर्लक्षित आहेत.

भाट या समाजानी जपलेल्या पोथी, वंशावळी ला शासन मान्यता, पुरावा म्हणून मान्यता मिळावी व भाट समाजाने जपलेले वंशावळी दप्तराची नोंद व्हावी त्यांना मानधनाची तरतूद करावी अशी मागणी तेल्हारा येथील पत्रकार सत्यशील सावरकर यांनी केली आहे.

आम्ही भाट समाजातील लोक आजही आमच्या पूर्वजांनी जपलेला ऐतिहासिक ठेवा जपून वंशावळी दप्तराची नोंद घेत आहोत. आमच्या कडील दप्तरी कुळ वंशावळ नोंदणी चे काम निष्ठेने करतो परंतु दारोदार फिरून मिळेल त्या तुटपुंजीतून उदरनिर्वाह कठिण जात आहे… अनिल समाधान भाट,टाकळी विरो(खारोडे सात गाव ), सेवकराम सुरतकर ,रा.पांढरी अंजनगाव (सावरकर आंबोडा 96 कुळ मराठा यांचे भाट ) 

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!