धार्मिकमहाराष्ट्र

माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ ., मीडिया महासम्मेलनाचे उद्घाटन सत्र: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ ., मीडिया महासम्मेलनाचे उद्घाटन सत्र: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ ., मीडिया महासम्मेलनाचे उद्घाटन सत्र: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

टीआरपीच्या मोहातून बाहेर पडलात तर तुमचा आणि समाजाचा दोघांचाही फायदा होईल– राज्यसभा खासदार सुभाष बराला

आपले पत्रकार दिव्य गुण आत्मसात करतील तर आदर्श आचारसंहितेची गरजच भासणार नाही – प्रा. डॉ. मानसिंह परमार

ब्रह्माकुमारीजमध्ये स्त्रीशक्तीसाठी ३३ किंवा ५० नव्हे, तर शंभर टक्के आरक्षण आहे – नरेश कौशल

आबूराज येथील ज्ञान सरोवरात सुरू असलेले मीडिया मंथन. 

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय मुख्यालय आबूराज (माउंट आबू) येथे सध्या मीडिया महाकुंभाचे वातावरण पाहायला मिळत आहे. संस्थेच्या मीडिया प्रभागातर्फे आयोजित या महासम्मेलनात देशभरातील दिग्गज पत्रकार, चिंतक, विचारवंत आणि मीडिया शिक्षक एकत्र येऊन चिंतन-मंथन करत आहेत. शुक्रवारी झालेल्या उद्घाटन सत्रात ‘वैश्विक शांततेची गरज आणि त्यात मीडियाची भूमिका’ या विषयावर देशभरातून आलेल्या मान्यवर वक्त्यांनी आपले विचार मांडले.

ब्रह्माकुमारीजमध्ये आल्यावर मन शांत आणि बुद्धी स्थिर झाली – सुभाष बराला,राज्यसभा खासदार

मुख्य अतिथी राज्यसभा खासदार सुभाष बराला यांनी उद्घाटन सत्रात बोलताना सांगितले की, माउंट आबू ही जगातील सर्वात दिव्य भूमी असल्याचे मला वाटते. येथे ब्रह्माकुमारीजमध्ये आल्यानंतर मन शांत, बुद्धी स्थिर आणि आनंदाची अनुभूती झाली. ही संस्था जगात एकमेवाद्वितीय आहे. महिला सक्षमीकरणाचे इतके उत्तम उदाहरण दुसरे कुठेही पाहायला मिळणार नाही. या संस्थेने नवे मानदंड निर्माण केले आहेत. १४० देशांमध्ये ही संस्था परमात्म्याचा संदेश पोहोचवत आहे. आत्मशुद्धीचे रहस्यही ही संस्था आपल्याला समजावून सांगते. ज्याने ते समजले तो पार झाला. माणसाची खरी ताकद शरीरात नसून आत्म्यात आहे – ती आत्मा अजर-अमर आहे, असे गीतेतही सांगितले आहे. त्या आत्म्याची ओळख करून देणे आणि परमात्म्याशी एकरूप कसे व्हावे हे शिकविण्याचे कार्य ब्रह्माकुमारीज करत आहे.

सध्याच्या परिस्थितीत मीडियाची जबाबदारी अधिक वाढली आहे. मीडिया फक्त बातम्या देत नाही, तर दृष्टिकोनही घडवतो. एक बातमी आशा निर्माण करू शकते, तर दुसरी भीती पसरवू शकते. मीडिया इच्छाशक्तीने देशाची दिशा बदलू शकतो. माउंट आबूहून शांतता आणि सत्याचा संदेश मिळतो, जो मीडियामार्फत घराघरात पोहोचू शकतो. मीडिया प्रश्न विचारतो तेव्हा प्रश्न घुमतो, पण समाधानही सुचवले तर प्रश्न सुटतो. आपण या पवित्र भूमीतून सकारात्मकतेचा संदेश घेऊन जाऊ या – आपण सकारात्मक बातम्या दाखवू शकतो का? सत्यापित बातम्या दिल्यास मीडियावर टीका होणार नाही. टीआरपीच्या मोहातून बाहेर पडलात तर तुमचा आणि समाजाचा दोघांचाही फायदा होईल. मजबूत समाज घडविण्यात मीडियाने आपली भूमिका पार पाडावी.

मीडिया केवळ माहिती देण्यासाठी नसून सामाजिक बांधिलकीही जपतो – डॉ. मानसिंह परमार

कुशाभाऊ ठाकरे पत्रकारिता विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. मानसिंह परमार यांनी प्रमुख वक्ते म्हणून सांगितले की, आपल्या कार्यस्थळी परतताना आपण असा संकल्प करावा की, आपण विश्वशांतीसाठी काय योगदान देऊ शकतो. आज जगभर अण्वस्त्रांची शर्यत सुरू आहे आणि मानवतेच्या बाजूने उभा राहणारा कोणी दिसत नाही. वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर हिंसा आणि युद्धाच्या बातम्याच असतात. भगवान श्रीकृष्णाने जशी मुरली वाजवली, तशी आज संगमयुगात बाबा मुरलीद्वारे शांततेचा संदेश देत आहेत. परमात्मा शिव ब्रह्मामुखातून ज्ञान देत आहेत. या दिव्य संदेशामुळे लोकांमध्ये चांगले गुण विकसित होत आहेत. जर पत्रकारांनी हे दिव्य गुण आत्मसात केले, तर आचारसंहितेची गरजच उरणार नाही. शुभभावनेत सर्व नैतिकता आणि ज्ञान सामावलेले आहे.

पत्रकारिता केवळ माहिती देण्यापुरती मर्यादित नसून सामाजिक बांधिलकीही तिची जबाबदारी आहे. सत्य दाखवताना संवेदनशीलता आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया सतत ब्रेकिंग आणि लाईव्हमध्ये गुंतलेला असतो, त्यामुळे तेथे शांततेचा संदेश देणे अधिक गरजेचे आहे. सोशल मीडिया देखील शांतता प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

विश्वशांतीसोबतच वैयक्तिक शांतताही महत्त्वाची – बीके मोहिनी दीदी

ब्रह्माकुमारीज संस्थेच्या मुख्य प्रशासिका राजयोगिनी बीके मोहिनी दीदी यांनी आशीर्वचनात सांगितले की, आपल्या विचारांचा आणि वाणीचा वातावरणावर परिणाम होतो. ज्यांच्या हातात लेखणी आणि वाणीची ताकद आहे, त्यांनी शांततेचा संदेश देणे अत्यंत गरजेचे आहे. प्रगतीसाठी मनःशांती आवश्यक आहे. शांततेमुळे सर्जनशीलतेला बळ मिळते. म्हणून प्रत्येकाने शांतचित्त होण्याचा प्रयत्न करावा.

इतरांप्रती शुभभावना आणि शुभेच्छा ठेवा – बीके सरला दीदी

मीडिया प्रभागाच्या उपाध्यक्ष बीके सरला दीदी यांनी सांगितले की, या परिषदेत विविध सत्रांमधून मीडियाच्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली आहे. मीडियाने आपल्या उद्दिष्टांमध्ये ईश्वराकडून मिळणारे समाधान समाजापर्यंत पोहोचवावे. ब्रेकिंग न्यूज देताना धक्का देणाऱ्या बातम्या द्याव्या लागतात, पण तरीही इतरांप्रती शुभभावना ठेवणे आवश्यक आहे.

शांततेचा अनुभव ध्यानातून – बीके शीलू दीदी

एज्युकेशन विंगच्या उपाध्यक्ष बीके शीलू दीदी यांनी राजयोग मेडिटेशनचा अनुभव दिला. त्यांनी सांगितले की, शांततेचा खरा अनुभव ध्यानातून मिळतो. “मी आत्मा आहे, माझा स्वधर्म शांती आहे” ही जाणीव महत्त्वाची आहे.

शांती हा आपला संस्कार आहे – बीके सुदेश दीदी

संयुक्त मुख्य प्रशासिका राजयोगिनी बीके सुदेश दीदी यांनी सांगितले की, संपूर्ण विश्व हे आपले कुटुंब आहे. भारत हा शांततेचा दूत आहे. आपल्या संस्कारांमध्ये शांतता आहे. परमात्म्याशी संबंध जोडल्याशिवाय खरी शांतता मिळत नाही. सकारात्मकता, पवित्रता आणि सत्यता यांची आवश्यकता आहे.

आपण आपल्या घरातच आलात – करुणा भाई

ब्रह्माकुमारीजचे महासचिव आणि मीडिया विंगचे अध्यक्ष बीके करुणा भाई यांनी सांगितले की, हे ईश्वरीय विद्यापीठ ९० वर्षांपासून “सारा विश्व एक कुटुंब आहे” हा संदेश देत आहे. येथे आपण आपल्या घरात आल्यासारखे समजावे.

विशिष्ट अतिथींचेही मनोगत

डीडी न्यूज, नवी दिल्लीचे सल्लागार संपादक मनीष बाजपेई यांनी सांगितले की, समाजातील समस्यांचे योग्य निदान करणे आवश्यक आहे. भौतिकता आणि आध्यात्मिकता यामध्ये संतुलन राखणे गरजेचे आहे.

दैनिक ट्रिब्यून, चंदीगडचे संपादक नरेश कौशल यांनी सांगितले की, सध्या जग अशांततेच्या टप्प्यातून जात आहे. अशा परिस्थितीत मीडियाची सकारात्मक भूमिका अत्यावश्यक आहे.

 ब्रह्माकुमारीजमध्ये स्त्रीशक्तीला शंभर टक्के प्रतिनिधित्व आहे.

भुवनेश्वर येथील ‘द संबाद’ आणि ‘कनक टीव्ही’च्या संपादक तान्या पटनायक यांनी सांगितले की, भगवान जगन्नाथांच्या शिकवणीतून एकात्मतेचा संदेश मिळतो. आजच्या एकल कुटुंब पद्धतीत मीडियाची जबाबदारी वाढली आहे.

पुस्तक प्रकाशन –

बुलढाणा येथील दैनिक देशोन्नतीचे संपादक डॉ. राजेश राजोरे आणि जळगाव विद्यापीठाचे डॉ. सोमनाथ वडनेरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. मधुरवाणी ग्रुपने स्वागत गीत सादर केले, तर डायमंड डान्स ग्रुपच्या कुमारी नीताने स्वागत नृत्य सादर केले. छत्तीसगड राज्य समन्वयक बीके मंजू दीदी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!