ग्रंथावर डोकं ठेवाच त्याच बरोबर ग्रंथातील लेखी ठेवा डोक्यात घातल्यास जीवाचे कल्याण होईल – सुश्री रामप्रिया माईजी
श्री बेलेश्वर महादेव संस्थान बेलखेड येथील भव्य शिवमहापुराण कथा प्रारंभ.
ग्रंथावर डोकं ठेवाच त्याच बरोबर ग्रंथातील लेखी ठेवा डोक्यात घातल्यास जीवाचे कल्याण होईल – सुश्री रामप्रिया माईजी
श्री बेलेश्वर महादेव संस्थान बेलखेड येथील भव्य शिवमहापुराण कथा प्रारंभ.

बेलखेड येथील श्री बेलेश्वर महादेव मंदिरात सुरु असलेल्या शिव महापुराण कथेला दि 25 एप्रिल ला धार्मिक उत्साहाने सुरुवात झाली. वैशाख पौर्णिमा उत्सवा निमित्त दर वर्षी शिवकथा किर्तन सेवा आणि विविध सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन बेलेश्वर उत्सव समिती आणि संपूर्ण गावातील लोकांकडून दर वर्षी केल्या जाते.
या उत्सवाला अनेक पिढ्याची परंपरा असून गावाचे ग्रामदैवत असणाऱ्या या शिवमंदिरात अक्षय तृतीये पासून अनेक पारंपरिक प्रचलित अश्या कार्यक्रम केल्या जातात.

बेलखेड येथे सुरू झालेल्या शिव महापुराण कथेला वाचक म्हणून सुप्रसिद्ध कथा वाचक सुश्री रामप्रियाजी माई यांच्या अमृत वाणीने सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी संपूर्ण वातावरण आध्यात्मिक झाले आहे. असून आध्यात्मिक महत्त्व आज विषद करताना सुश्री रामप्रियाजी माई यांनी ग्रंथावर डोके ठेवाच पण त्याच बरोबर त्यातील मजकूर संदेश, उपदेश डोक्यात घेऊन आचरणात आणण्याची गरज असल्याचे सांगून आजच्या सेवेत विविध दाखले, दृष्टांत विषद केले.
सात दिवस एका पेक्षा एक उत्तम कीर्तन सेवा या ठिकाणी असल्याने गावाकर्यांचा मोठा सहभाग येथे दिसून येत आहे. दि 30एप्रिल ला ग्रामप्रदक्षिणा आणि दि 1मे ला भव्य असा महाप्रसाद आयोजित केल्या असल्याने संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी घेण्याचे आवाहन श्री बेलेश्वर महादेव संस्थान चे वतीने केले आहे.