आपला जिल्हा अकोलाधार्मिक

माळेगाव बाजार येथील साध्वी चंफामाता यात्रा महोत्सव सुरू, सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम. 

माळेगाव बाजार येथील साध्वी चंफामाता यात्रा महोत्सव सुरू, सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम. 

माळेगाव बाजार येथील साध्वी चंफामाता यात्रा महोत्सव सुरू, सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम. 

तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथील ग्रामस्थांचे आराध्य दैवत साध्वी चंफामाता यात्रा महोत्सवास २५ एप्रिल रोज शनिवारपासून प्रारंभ होत असून या निमित्त ह.भ.प. गोदावरीताई बंड यांच्या अमृतवाणीमधून संगीतमय श्रीगद् भागवत कथेस प्रारंभ होत आहे.

कथे दरम्यान काकडा आरती, हरीपाठ, यासह दररोज रात्री ८.३० वा. हरीकिर्तन व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. २५ एप्रिलपासून किर्तन सेवेत ह.भ.प. श्याम महाराज काळमेघ (अमरावती), हभप अमोल नहाराज घुगे (पास्टूल), हभप विजय महाराज गवळी (अमानीकर), हभप कु. कांचनाताई शेळके (अमडापूर), हभप सौ. भारतीताई गाडेकर (वैजापूर), हभप संतोष महाराज जाधव (आळंदी), गुरुवर्य हभप तुकाराम महाराज (सखारामपूर) यांचे किर्तन होणार असून शनिवार २ मे रोजी सकाळी १० व. काल्याचे किर्तन हभप गोदावरीताई बंड यांचे होणार आहे.

या सप्ताहादरम्यान बाहेर गावावरून येणाऱ्या श्रोत्यासाठी जेवण व राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून २ मे रोजी दुपारी ३ वाजता दिंडी सोहळा, सायंकाळी साध्वी चंफामातेची महाआरती संपन्न होणार असून लगेच दहिहांडी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी वरील सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक मंडळांनी केले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!