आपला जिल्हा अकोला

इयत्ता ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेचे दि.२६ एप्रिल २०२६ रोजी आयोजन.

इयत्ता ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेचे दि.२६ एप्रिल २०२६ रोजी आयोजन.

इयत्ता ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेचे दि.२६ एप्रिल २०२६ रोजी आयोजन.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७वी रविवार दि. २६ एप्रिल २०२६ रोजी अकोला जिल्ह्यातील एकूण १४९ परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे.

सदर परीक्षेसाठी तालुकानिहाय परीक्षा केंद्राची संख्या खालील प्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.

अनं तालुका ४थी ७वी

१) अकोला पंस- २५ २१

२) अकोला मनपा ३ २

३) अकोट १७ १०

४) बाळापुर ११ १०

५)बार्शिटाकळी ६ ५

६)मुर्तिजापुर ८ ५

७) पातुर ६ ४

८) तेल्हारा १० ६

*एकूण* ८६ ६३

सदर परीक्षेसाठी संपूर्ण अकोला जिल्ह्यामधुन इयत्ता ४थी चे १३४४९ व इयत्ता ७वी चे ९१७१ असे एकूण २२६२० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले आहे. जिल्हास्तरावरून परीक्षा केंद्राला भेटी देण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर परीक्षेचे दोन पेपर आहे

पेपर १ – प्रथमभाषा व गणित 

           वेळ सकाळी ११ ते १२.३०

पेपर २- तृतीय भाषा व बुद्धीमत्ता 

           वेळ दुपारी २.०० ते ३.३०

सदर परीक्षेचे संपूर्ण नियोजन पूर्ण झाले असून उन्हाची तिव्रता लक्षात घेता सर्व केंद्रसंचालक यांना परीक्षा केंद्रावर आवश्यक खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. तसेच परीक्षेदरम्यान एखादया विद्यार्थ्यांस काही त्रास झाल्यास तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून घेणेसाठी परीक्षा केंद्राच्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा खाजगी डॉक्टर यांची माहिती ठेवण्याबाबत केंद्र संचालकांना कळविले आहे.

सदर परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हासमन्वयक म्हणून रतनसिंग पवार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सहसमन्वयक म्हणून जितेंद्रकुमार प्रधान उपशिक्षणाधिकारी( प्राथमिक ) तसेच श्याम राऊत विस्तार अधिकारी शिक्षण व अरविंद जाधव विस्तार अधिकारी शिक्षण हे कामकाज पाहात आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!