मुंबई येथे ZRUCC बैठकीत महाप्रबंधका सोबत विदर्भाच्या रेल्वे मागण्यांचा उहापोह.,हिवरखेड तेल्हारा खामगाव या पन्नास वर्षे जुन्या रेल्वे मागणी सह विविध मागण्यांचे निवेदन.
मुंबई येथे ZRUCC बैठकीत महाप्रबंधका सोबत विदर्भाच्या रेल्वे मागण्यांचा उहापोह.,हिवरखेड तेल्हारा खामगाव या पन्नास वर्षे जुन्या रेल्वे मागणी सह विविध मागण्यांचे निवेदन.
मुंबई येथे ZRUCC बैठकीत महाप्रबंधका सोबत विदर्भाच्या रेल्वे मागण्यांचा उहापोह.,हिवरखेड तेल्हारा खामगाव या पन्नास वर्षे जुन्या रेल्वे मागणी सह विविध मागण्यांचे निवेदन.

मध्य रेल्वे मुबंईच्या अत्यंत महत्त्वाच्या माणल्या जाणाऱ्या ZRUCC ची १२७ वी बैठक मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे 23 एप्रिल रोजी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव तर सचिव उपमहाप्रबंधक कुश किशोर मिश्रा यांचे सह रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. बैठकीत सर्वप्रथम खा. अनुप धोत्रे यांनी विविध रेल्वे समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. त्याला रेल्वे अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. त्यानंतर समितीच्या संपूर्ण महाराष्ट्रभरातून आणि मध्यप्रदेश तथा कर्नाटक मधून आलेल्या प्रत्येक ZRUCC सदस्यानें आपापल्या मागण्या व्यक्त केल्या.

ZRUCC समितीचे नवनियुक्त सदस्य श्याम आकोटकार यांनी पश्चिम विदर्भातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्यांचा आणि समस्यांचा पाठपुरावा करत प्रशासनाचे लक्ष वेधले. निवडीनंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. पश्चिम विदर्भाच्या विकासासाठी प्रस्तावित जालना खामगांव रेल्वेमार्गाचा विस्तार खामगाव- शेगाव- तेल्हारा- हिवरखेड पर्यंत करण्यात यावा, शेगाव येथून अकोला वाशिम पूर्णा मार्गे मुंबई साठी संत गजानन महाराज एक्सप्रेस सुरु करावी, तसेच मुंबई अकोला अकोट मेळघाट एक्सप्रेस सुरू करावी,अकोट अचलपूर चांदुर बाजार नवीन रेल्वे मार्ग व्हावा, अकोल्यात मध्य रेल्वे चे सर्व प्लॅटफॉर्म दक्षिण मध्य रेल्वे सोबत जोडावे,अकोला शेगाव येथून नवीन गाड्या सुरु करण्यासाठी पिट लाईन निर्मिती करावी, अकोला दिल्ली जम्मू रेल्वे गाडी सुरू करावी, खामगाव पुणे रेल्वे सुरू करावी, अकोला खंडवा मार्ग मध्य रेल्वे कडे हस्तांतरित करावा, प्रवासी सुविधांमध्ये वाढ करणे आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देणे यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच तेल्हारा तालुक्यातुन 40 संघटनाची निवेदने श्याम आकोटकर आणि धिरज बजाज यांनी सुपूर्द केली याबाबत रेल्वे प्रशासनाने अनेक मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.
विविध रेल्वे प्रश्नासाठी 40 च्या वर संघटनांनी दिले निवेदन –
मध्य रेल्वे बैठकीच्या पार्श्वभूमीवर ZRUCC सदस्य श्याम आकोटकर आणि सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांनी महाप्रबंधक, उपमहाप्रबंधक आणि सर्वोच्च अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रत्यक्ष सविस्तर चर्चा करून पश्चिम विदर्भातील विविध रेल्वे मागण्यांचे अंदाजे 40 संघटनांची निवेदने ऑन रिकॉर्ड दाखल केली. ज्यामध्ये ZRUCC सदस्य श्याम आकोटकर, हिवरखेड विकास मंच, नगराध्यक्ष, नगरपरिषद तेल्हारा, सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, गट ग्रामपंचायत वाडी अदमपूर जाफ्रापुर, विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्स & इंडस्ट्री, भारतीय जनता पार्टी तेल्हारा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी , वंचित बहुजन आघाडी तेल्हारा, शिवसेना तेल्हारा, तेल्हारा शहर काँग्रेस कमिटी, कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हारा,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघ शाखा तेल्हारा तालुका पत्रकार संघ, विश्व हिंदू परिषद बजरंग दल, लोकजागर मंच, वकील संघ बार असोसिएशन, भाजपा नगरसेवक गजानन गायकवाड, जितेंद्र राठी,तेल्हारा तालुका कृषी व्यावसायिक संघटना, तेल्हारा तालुका व्यवसायिक संघ, शहीद भगतसिंग मंडळ, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती समिती, श्री. छत्रपती प्रतिष्ठान तेल्हारा, निमा, श्री. नारायणी सेना महाराष्ट्र, युवा शक्ती संघटना, एकता बहुउद्देशीय क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ, अग्रवाल सेवा समिती तेल्हारा, तेल्हारा तालुका मुस्लिम संघटना, कुणबी समाज संघटना तेल्हारा, श्री माहेश्वरी मंडळ तेल्हारा, कुरेशी फाउंडेशन अल्पसंख्यांक बहुउद्देशीय संस्था, तेल्हारा तालुका माहेश्वरी संघटन, श्री. अग्रसेन भवन समिती सोबतच सामाजिक कार्यकर्ते रजनीश पोटे, चेतन पाडिया अग्रवाल यांचेसह अनेक जागरूक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने निवेदने देऊन रेल्वे संबंधी मागण्या रेटून धरल्या आहेत.
“केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय कुटे यांच्यामुळे मला या महत्त्वपूर्ण समितीत काम करण्याची संधी मिळाली आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे प्रवाशांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. खामगाव- शेगाव- तेल्हारा- हिवरखेड या नवीन रेल्वे मार्गा सोबतच सर्व बाबींचा पाठपुरावा वरिष्ठ स्तरावर केला जात आहे. ” रेल्वे प्रशासनाकडून पश्चिम विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.” मागण्या मंजूर होण्यासाठी आता वरिष्ठ लोकप्रतिनिधीनी सुद्धा सकारात्मक पुढाकार घेणे आवश्यक आहे – श्याम आकोटकर ZRUCC सदस्य, मध्य रेल्वे, मुंबई
वरिष्ठ लोकप्रतिनिधींचा पुढाकार आवश्यक –
जालना खामगाव मार्गाचा विस्तार खामगाव शेगाव तेल्हारा हिवरखेड पर्यंत झाल्यास पश्चिम विदर्भाचा विकास झपाट्याने होईल. बुलढाणा अकोला जिल्हासह तेल्हारा संग्रामपूर बाळापुर शेगाव खामगाव इत्यादी तालुक्यांची भरभराट होईल. हा मार्ग पश्चिम विदर्भासाठी किती महत्त्वाचा आहे याचे विश्लेषण सामाजिक कार्यकर्ते रजनीश पोटे यांनी सविस्तरपणे केले आहे. आता या मार्गासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर, अकोला खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार संजय कुटे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार नितीन देशमुख, आमदार श्वेताताई महाले, यांचे सह सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री श्रीमती सुमित्राताई पवार इत्यादीं मान्यवरांच्या वेळोवेळी भेटी घेऊन मागणी पूर्ण करावी अशी जनभावना सर्व स्तरातून दिसून येत आहे.