आपला जिल्हा अकोला

स्वरसाधनेचा सुरेल आरंभ, नवोदित कलाकारांना मिळणार मोठ व्यासपीठ.,सौ संगीताताई जयंतराव गावंडे (संगीत विशारद )स्वरसाधना संगीत अकॅडमी तेल्हारा च्या संचालिका यांचे आयोजन. 

तेल्हारा शहरातील कला व संगीत क्षेत्राला नवी दिशा देणारे स्वरसाधना संगीत क्लासच्या वतीने पथ कला आणि फिल्मी गीत गायन व रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजन शनिवारी, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता से.ब.विद्यालय, तेल्हारा येथे करण्यात आले आहे. या माध्यमातून स्थानिक नवोदित कलाकारांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी एक सक्षम मंच उपलब्ध होणार असल्याने शहरातील कला रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्वरसाधना संगीत क्लासच्या संचालिका सौ. संगीताताई जयंतराव गावंडे यांनी केले आहे. 

स्वरसाधना क्लासच्या माध्यमातून पथ कला आणि फिल्मी गीत गायन व रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजन हे लपलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी असून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे. ग्रामीण भागातील अनेक गुणी कलाकारांना योग्य संधी मिळत नसल्याची खंत दूर करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन अनिलभाऊ गावंडे (संस्थापक, लोकजागर मंच) यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी सौ. वैशालीताई जितेंद्र पालीवाल (नगराध्यक्ष, नगर परिषद तेल्हारा) उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून राजेश रमेशराव खारोडे, इंजि. नगरसेवक अमित अग्रवाल,विठ्ठलराव खारोडे सह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत राहणार आहेत. शहरातील अनेक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींचा सहभागही या सोहळ्याला लाभणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन सौ. संगीता जयंतराव गावंडे (संगीत विशारद) यांनी केले असून आणि संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता आयोजिका सौं संगीताताई जयंतराव गावंडे (संगीत विशारद )स्वरसाधना संगीत अकॅडमी च्या संचालिका व चमु प्रयत्न करीत आहेत.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!