आपला जिल्हा अकोलानिवडणुक

तेल्हारा तालुक्यातील राजकीय पदाधिकारी, पत्रकार, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांची सभा., उपविभागीय अधिकारी अकोट यांनी केले मार्गदर्शन.

तेल्हारा तालुक्यातील राजकीय पदाधिकारी, पत्रकार, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांची सभा., उपविभागीय अधिकारी अकोट यांनी केले मार्गदर्शन.

तेल्हारा तालुक्यातील राजकीय पदाधिकारी, पत्रकार, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांची सभा., उपविभागीय अधिकारी अकोट यांनी केले मार्गदर्शन.

मा. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 14.05.2026 रोजी मतदार या‌द्याचा विशेष सखोल पुनरिक्षणाचा (Special Intensive Revision (SIR)) कार्यक्रम घोषित केला आहे. तसेच मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशानुसार सदर कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राबवयाचे सुचित केलेले आहे त्या अनुषंगाने तेल्हारा तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी अकोट यांच्या अध्यक्षतेखाली तेल्हारा तालुक्यातील राजकीय पक्ष पदाधिकारी, पत्रकार व मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांची सभा सोमवारी दुपारी 3:30 वा. संपन्न झाली. 

मतदार याद्याचा विशेष सखोल पुनरिक्षणाचा (Special Intensive Revision (SIR)) च्या अनुषंगाने 28 अकोट विधानसभा मतदारसंघा अंतर्गत तेल्हारा तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष/पत्रकार वृंद / मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व सहा. मतदार नोंदणी प्रतिनिधी (BLA) यांची सभा मनोज लोणारकर, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, अकोट यांच्या अध्यक्षते खाली दिनांक 29.06.2026 रोजी तहसिलदार यांचे दालन, तहसिल कार्यालय, तेल्हारा येथे घेण्यात आली आहे.

सदर सभेमध्ये मतदार या‌द्याचा विशेष सखोल पुनरिक्षणाचा (Special Intensive Revision (SIR)) कार्यक्रम अंतर्गत दिनांक 30.06.2026 ते 29.07.2026 या कालावधी मध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व सहा. मतदार नोंदणी अधिका-यांमार्फत घरोघरी मतदार यांना भेटी देण्यात येणार आहे. भेटी दरम्यान ज्या मतदारांचे नाव मतदार यादी मध्ये समाविष्ट आहे. अशा मतदार यांना Enumeration Form – (EF) चे वाटप करण्यात येणार आहे. सदर Enumeration Form मध्ये मतदार यांनी आपले सन 2002 च्या यादीतील स्वतः ची किंवा आपल्या वडील/आई/आजोबा/आजी यांची माहिती भरण्यात यावी. तसेच मतदार यांनी जन्म तारिख / आधार कार्ड नंबर/संपर्क क्रमांक/वडील/आई/पती/पत्नीचे नाव नमुद करण्यात यावे त्यांच प्रमाणे त्यांचे मतदान कार्ड नंबर बाबत माहिती भरुन संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व सहा. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना तात्काळ देण्यात यावे.

मतदार या‌द्याचा विशेष सखोल पुनरिक्षणाचा (Special Intensive Revision (SIR)) कार्यक्रमानुसार दिनांक 05.08.2026 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात येणार आहे. दिनांक 05.08.2026 ते 04.09.2026 या कालावधीमध्ये दावे व हरकती सादर करता येतील. दिनांक 05.08.2026 ते 03.10.2026 या कालावधी मध्ये नोटीस टप्पा/दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहे. दिनांक 07.10.2026 रोजी अंतीम मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात येणार आहे. सदर मोहिमबाबत जास्तीत जास्त वृत्तपत्रात व इतर माध्यमातून प्रसिध्दी देण्याची तसेच सर्व राजकीय पक्षाणी सहा. मतदार केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांची मतदान केंद्रनिहाय नेमणूक करुन या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन मनोज लोणारकर, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, अकोट यांनी विशेष सभेमध्ये करण्यात आले आहे अशी माहिती तेल्हारा तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी महेश रामगुंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!