आपला जिल्हा अकोलाआपला जिल्हा अमरावतीआपला जिल्हा बुलढाणाधार्मिक

श्री ज्ञान भास्कर सेवा संस्था द्वारा संचालीत श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे भव्य बालसंस्कार शिबिराचे दिनांक १ ते २० मे २०२६ पर्यंत आयोजन. 

श्री ज्ञान भास्कर सेवा संस्था द्वारा संचालीत श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे भव्य बालसंस्कार शिबिराचे दिनांक १ ते २० मे २०२६ पर्यंत आयोजन. 

श्री ज्ञान भास्कर सेवा संस्था द्वारा संचालीत श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे भव्य बालसंस्कार शिबिराचे दिनांक १ ते २० मे २०२६ पर्यंत आयोजन. 

      संतश्री वासुदेवजी महाराज हेच बाल संस्कार शिबिर या संकल्पनेचे आद्यजनक असून , गत शतकातील ४० च्या दशकात गतिमान युगाला नीतिमान बनविण्यासाठी श्रीक्षेत्र भास्कर नगर आडगाव बु ll या ठिकाणी या शुभ कार्याची मुहूर्तमेढ त्या द्रष्ट्या संतांनी रोवली. त्याच उज्वल परंपरेचा वारसा जोपासत गत २० वर्षापासून श्री ज्ञान भास्कर सेवा संस्था हिंगणी खुर्द र. न. ई. ६०७ द्वारा संचालीत श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिराचे श्री भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या कुशल मार्गदर्शना मध्ये दिनांक १ ते २० मे २०२६ पर्यंत भव्य प्रमाणात आयोजन केले आहे.

       या शिबिराकरिता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तथा सीमावर्ती राज्यातून सुद्धा शेकडोच्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होत असतात. ज्ञानेश आश्रम ही संस्था सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात असून , या ठिकाणी गुरुकुल पद्धतीने निवासी स्वरूपाचे हे बालसंस्कार शिबिर घेतल्या जाते. सदर्हू शिरामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारल्या जात नसून; विशेष म्हणजे बालकांना सर्वांगीण विकासाचे धडे देणाऱ्या श्रींच्या कृपांकित असणाऱ्या निष्ठावंत शिक्षकांना सुद्धा मानधन दिल्या जात नाही.

      विशेष म्हणजे यावर्षी १७ मे पासून पुरुषोत्तम मास आरंभ होत असून , त्या पर्वकाळात संतश्री वासुदेवजी महाराज यांचे कृपांकित भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने १७ ते १९ दरम्यान त्रिदिवसीय कार्यक्रमात विविध धार्मिक अनुष्ठानाचे उपक्रम बालसंस्कार शिबिरामध्ये राबविले जाणार आहेत.

दरम्यानच्या काळात विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाकरिता उपस्थित राहणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाची व प्रत्यक्ष भेटीची सुसंधी शिबिरार्थींना प्राप्त होऊन, त्याचा त्यांना वर्तमानात व भविष्यात सुद्धा खूप मोठा फायदा होणार आहे. तसेच २० मे ला पहाटे पाच वाजता बाल भागवतांचा भव्य पायीदिंडी सोहळा श्रीक्षेत्र वारी हनुमान येथे जाऊन संध्याकाळी ६ ते १० च्या दरम्यान अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकासह शिबिर समारोपाचा कार्यक्रम संपन्न होईल. तरी पालकांनी उपरोक्त शिबिरामध्ये आपल्या बालकांना पाठवून संस्कृती रक्षणाच्या कार्याला तन-मन-धनाने सहकार्य करण्याचे आवाहन विश्वस्त मंडळांनी केले असल्याचे व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक कळवितात.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!