वैशाख पौर्णिमा यात्रा महोत्सव निमित्त बेलखेड श्री बेलेश्वर महादेव मंदिरात शिवमहापुराण कथेचे आयोजन.
वैशाख पौर्णिमा यात्रा महोत्सव निमित्त बेलखेड श्री बेलेश्वर महादेव मंदिरात शिवमहापुराण कथेचे आयोजन.
वैशाख पौर्णिमा यात्रा महोत्सव निमित्त बेलखेड श्री बेलेश्वर महादेव मंदिरात शिवमहापुराण कथेचे आयोजन.

तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील श्री बेलेश्वर महादेव पुरातन मंदीर येथे वैशाख पौर्णिमा यात्रा महोत्सव निमित्त शिव महापुराण कथेचे आयोजन दिनांक 24 एप्रिल पासून प्रारंभ होत असून सांगता दि. 1 मे रोजी भव्य अशा महाप्रसादाने होणार आहे. या सप्ताह दरम्यान पहाटे काकडा सकाळी शिवलीलामृत पारायण, शिव महापुराण कथा संध्याकाळी हरिपाठ, हरिकीर्तन होणार आहे.

बेलखेड येथील श्री बेलेश्वर महादेव पुरातन मंदिराची ऐतिहासिक आख्यायिका आहे. या मंदिराच्या संस्थानचे वतीने बेलखेड ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. वैशाख पौर्णिमा यात्रा महोत्सव निमित्त शिव महापुराण कथेचे आयोजन दरवर्षी प्रमाणे केले आहे. या मध्ये या शिव महापुराण कथेचे कथावाचन रामाश्रयी श्री.रामप्रियाश्रीजी माई यांची उपस्थिती लाभणार आहे. दररोज रात्री हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये हभप ज्ञानेश्वर महाराज देशमुख, ह भ प कार्तिक महाराज इंगोले, ह भ प संदीप महाराज गिहें, हभप धर्माचार्य मधुकर महाराज जोगदंड, ह भ प नारायण महाराज पडोळे, ह भ प सुरेखाताई पाटील, ह भ प रमेश महाराज दुधे यांचे दररोज हरिकीर्तन होणार आहे.

या सप्ताह दरम्यान दररोज अन्नदान सुद्धा होणार आहे त्या करिता निवृत्ती खुमकर, वसंत लोळे, क्रांतीकुमार सावरकर, दिलीप उंबरकर, संजय इंगळे, गजानन राऊत, योगेश तायडे, योगेश कुयटे, प्रभाकर गोमासे, अमोल जाधव, मयूर खुमकर, गजानन अरबट, दिपक भोपळे ह्याची अन्नदान सेवा राहील.
दररोज होणारे विविध धार्मिक कार्यक्रमासाठी ह भ प विठ्ठल महाराज देशमुख गायनाचार्य, गजानन महाराज मडसे, गायनाचार्य अभिषेक महाराज सावके, मृदंगाचार्य व ह भ प भीमराव महाराज कडू (उत्कृष्ट झांसी सजावट) यांची साथ राहणार आहे.
श्री बेलेश्वर महादेव मंदिर येथून दि. ३० एप्रिल रोजी दुपारी ५ वाजता संपूर्ण बेलखेड नगरीतुन भव्य दिव्य दिंडी विविध धार्मिक, सामाजिक,संदेश दर्शविणारे झांसी सह टाळमृदंगाच्या नि नादात दिंडी काढण्यात येणार आहे व दि १ मे रोजी सकाळी हभप ज्ञानेश्वर महाराज देशमुख यांचे काल्याचे किर्तन होणार असुन १२ वाजता पासून दिवसभर महाप्रसादाचे आयोजन होणार आहे तरी या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे श्री बेलेश्वर महादेव संस्थान बेलखेड आयोजन समिती व ग्रामस्थ यांच्या कडुन कळविण्यात आले आहे.