तेल्हारा येथील दोन दिवसीय भव्य धम्म परिषदेत नामवंत भिक्षूंचे मार्गदर्शन. बौद्ध उपासक उपासिकांची उपस्थिती लक्षणीय.

तेल्हारा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय भव्य धम्म परिषदेचे आयोजन संपन्न झाले. तेल्हारा दोन दिवसीय भव्य धम्म परिषदेत नामवंत भिक्षूंचे मार्गदर्शन झाले याचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
श्रोतापन्न मार्ग रूढ संघ आणि बौद्ध समाजाच्या वतीने संपन्न झालेल्या या भव्य धम्म परिषदेचे अध्यक्ष पूज्यनीय भिक्षु खेमधम्मो महास्थवीर , पूजनीय भदंत बोधी पालो महाथेरो, आणि प्रमुख उपस्थिती डॉ. भदंत आर. एस. इंदवस छत्रपती संभाजीनगर, भदंत कश्यप महाथेरो, धम्म परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक पूज्यनीय भदंत बी.संघपालजी महाथेरो , प्रमुख उपस्थिती भिक्षु ग्यानरक्षित थेरो, पूज्यनीय आर्याजी धम्मदर्शनी महाथेरी, पूजनीय भिक्षु करुणानंद महास्थवीर , सुमंगल बोधी महाथेरो, रत्नदीप थेरो , भदंत स्वरानंद यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजक भंते शाक्यपुत्र राहुल, भदंत एस. संजीव, भदंत विनयपालजी महाथेरो, यांचे उपस्थिती मध्ये दोन दिवशीय परिषद संपन्न झाली.
दोन दिवशीय या धम्म परिषदेच्या यशस्वीते साठी तेल्हारा श्रोतापन्न मार्ग रूढ संघ आणि बौद्ध समाजाच्या वतीने अथक परिश्रम घेण्यात आले. धम्म परिषदेला तालुक्यातील व विविध ठिकाण चे उपासक उपासिकांची उपस्थिती लक्षणीय होती.