जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविकांचा सन्मान
जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविकांचा सन्मान
जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविकांचा सन्मान.

अकोला, दि. ९ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांना उल्लेखनीय कार्याबद्दल उत्कृष्ट कार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी माया शिर्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मिलिंद मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत पवार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजश्री कोलखेडे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे आदी उपस्थित होते.

अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, कर्मचा-यांचे विविध योजना- उपक्रमांच्या अंमलबजावणीत मोठे योगदान आहे. कर्मचारी गावोगाव अहोरात्र परिश्रम घेऊन योजना व माहिती घरोघर पोहोचवित असतात. महिला कर्मचा-यांचे कार्य महत्वपूर्ण आहे, असे श्रीमती मेश्राम यांनी यावेळी सांगितले.

सहायक प्रकल्प अधिकारी अर्चना काळे, हरिहर परिहार, बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना इंगोले, माजी जि.प सदस्य प्रतिभा अवचार यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.