आपला जिल्हा अकोलाधार्मिक

टाळमृदंगाच्या गजरात सांप्रदायिक पद्धतीने शिवजयंतीची तेल्हाऱ्यात भव्य शोभायात्रा.,तेल्हारा शहर शिवमय, भगवी ललाट. 

टाळमृदंगाच्या गजरात सांप्रदायिक पद्धतीने शिवजयंतीची तेल्हाऱ्यात भव्य शोभायात्रा.,तेल्हारा शहर शिवमय, भगवी ललाट. 

टाळमृदंगाच्या गजरात सांप्रदायिक पद्धतीने शिवजयंतीची तेल्हाऱ्यात भव्य शोभायात्रा.,तेल्हारा शहर शिवमय, भगवी ललाट.

तेल्हारा दि – : सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरात पारंपरिक व सांप्रदायिक पद्धतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात, भगवे ध्वज, लेझीम पथक, आदिवासी नृत्य, भारुड , डमरू ढोल-ताशांच्या तालावर शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला यामुळे संपूर्ण शहर शिवमय झाले होते.

शोभायात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला भगिनी, तसेच लहान मुलांनी मा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेत सहभाग घेत आकर्षण ठरले. शोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करून फराळ पाणी व थंड पेय चे वाटप करून शोभायात्रेचे स्वागत केले. शिस्तबद्ध मिरवणूक, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.या भव्य शोभायात्रेमुळे तेल्हारा शहरात उत्साहाचे व शिवमय,भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते सर्वांच्या सहभागामुळे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!