गुरुवर्य संत वासुदेव महाराज यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त ५०७ रुग्णांची मोफत तपासणी.
गुरुवर्य संत वासुदेव महाराज यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त ५०७ रुग्णांची मोफत तपासणी.
गुरुवर्य संत वासुदेव महाराज यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त ५०७ रुग्णांची मोफत तपासणी.

संत वासुदेव महाराज यांच्या १९९ व्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित रोगनिदान व औषधोपचार शिबिरात तब्बल ५०७ रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिरात रुग्णांना विनामूल्य औषधांचेही वाटप करण्यात आले.

श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे आयोजित या आरोग्य शिबिरात संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त डॉ. अशोकराव बिहाडे व डॉ. संजीवनीताई बिहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. डॉ. अमोल रावणकर, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. शिवाजीराव ठाकरे, डॉ. अपर्णा पखान, डॉ. शुभांगी बिहाडे, डॉ. प्रसन्न पुंडकर, डॉ. वैष्णवी पुंडकर, डॉ. मनोज गावंडे, डॉ. अभिनय झापे, डॉ. विनोद कोल्हे, डॉ. शीतल गावंडे, डॉ. अभिजित पुंडकर, डॉ.प्रतिक भेडे, डॉ. राम बिहाडे, डॉ. अमोल राजगुरू, डॉ. सुहास कुलट, डॉ. ऋतुजा राजगुरू, डॉ. विजय बिहाडे, डॉ. संतोष पखान, डॉ. दर्शन कुलट, डॉ. ऐश्वर्या कुलट व डॉ. शिवानी बिहाडे आदींनी रुग्णसेवा बजावली.

गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी सवलतीच्या दरात सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. शिबिरात विविध आजारांवरील तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राजु कुकट, रविंद्र कापसे, अनिल गोंडचर, उमेश चोरे, प्रकाश बिहाड, अनिल सावरकर, प्रशांत धाबे, निलेश काळे, रत्नाकर रेळे, शरद पांडे, राममूर्ती वालसिंग, प्रविण वानखेडे, मदनराव देशमुख, रुपाली सामरे, श्वेता टिकार, सुवर्णा गोंडचर, आर्यन हिंगणकर, प्रणिता वानखेडे, अजय आखरे आदींनी मोलाचे सहकार्य केले.