आपला जिल्हा अकोला

सुरांच्या साधनेचा सन्मान., कु.गौरी मालठानकर विद्यापीठाच्या तिन पुरस्कारांची मानकरी.

सुरांच्या साधनेचा सन्मान., कु.गौरी मालठानकर विद्यापीठाच्या तिन पुरस्कारांची मानकरी.

सुरांच्या साधनेचा सन्मान., कु.गौरी मालठानकर विद्यापीठाच्या तिन पुरस्कारांची मानकरी.

तेल्हारा – स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालय अकोटची विद्यार्थीनी व तेल्हारा तालुक्यातील शिरसोली येथील वास्तव्यास असलेली प्रख्यात युवा कीर्तनकार कु. गौरी महादेव मालठाणकर हीने बी.ए. अंतिम वर्षाच्या संगीत विषयामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठातुन प्रथम येत विद्यापिठाव्दारे दिल्या जाणाऱ्या तिन पुरस्कारावर स्वतःचे नाव कोरले आहे. सर्वसामान्य कष्टाळू कुटुंबातील गौरी ला आजोबा ,वडील यांचा पारंपरिक सांप्रदायिक, अध्यात्मिक वारसा मिळाला तो पुढे चालवत …गौरी आपल्या गायना सोबतच समाज प्रबोधनपर किर्तनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते , हे गाण्याचे बाळकडू बालपणापासूनच मिळाले आणि त्याची फलश्रुती म्हणजे दुरदर्शन च्या सह्याद्री वाहिनीवर लहान मुलांच्या लोकप्रिय कार्यक्रम “धिना धिन धा” मध्ये सहभाग नोंदवला..जे जे..आपणासी ठावें..ते..ते इतरांशी सांगावें ज्ञाणी करून सोडावे सकळ जन या ओळींनां सार्थ करत..सोबतच शुभ मंगल प्रसंगी मंगलाष्टक, भावगित देशभक्तीपर गीतांचे सुंदर सादरीकरण गौरी नेहमीच करत असते..आल्या जन्मी समाजाचं काही देणं लागतं हि उदात्त भावना अंगिकारत अनेक गिताचें सुंदर आवाजात सादरीकरण केले.या उपक्रमाची दखल अनेक वृत्तपत्रांनी तसेच वृत्तवाहिन्यांनी घेतली अशा या बहुगुणी गौरीचा सन्मान सोहळा येत्या २३ फेबृवारी २०२६ रोजी विद्यापिठाच्या ४२व्या दिक्षांत समारंभात तिला स्व. प्रभाकरराव नवसाळकर रौप्य पदक, यादवराव केशवराव अंधारे स्मृती रोख पारीतोषिक, पं. दैविदासपंत के. काळे गुरुजी रोख पारीतोषिकाने गौरव करण्यात येणार आहे. श्री शिवाजी महाविद्यालयाचै विद्यार्थी सातत्याने विद्यापिठाच्या मेरीट यादीत स्थान मिळवतात. त्यातीलच कु गौरीने एकाच वेळी तीन पारीतोषिक प्राप्त केल्यामुळे महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष अँड.गजाननराव पुंडकर, केशवराव मेतकर, संस्थेचे कार्यकारीणी सदस्य सुरेशदादा खोटरे तथा संपुर्ण महाविद्यालय विकास समितीच्या सन्माननिय सदस्यानी अभिनंदन केले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल पांडे, उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय कोल्हे, कला शाखा प्रमुख प्रा.डॉ. अशोक इंगळे यांचेसह संगित विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रतिभा पवित्रकार, प्रा. डॉ. उत्तरा तडवी, प्रा.डॉ. मृणाल कडू, प्रा. डॉ. संतोष वावगे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे तिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!