आपला जिल्हा अकोलानिवडणुक

जिल्ह्यातील 76 ग्रामपंचायतींतील 139 जागांसाठी पोटनिवडणूक 

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 

जिल्ह्यातील 76 ग्रामपंचायतींतील 139 जागांसाठी पोटनिवडणूक, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 

अकोला, दि. 18 : जिल्ह्यातील 76 ग्रामपंचायतीतील 126 ग्रा. पं. सदस्य पदे व 13 थेट सरपंच पदे अशा एकूण 139 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ग्रा. पं. स्तरावर सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली.

राजीनामा, निधन, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकीसाठी पारंपरिक पद्धतीने मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांनी दिली. 

तेल्हारा तालुक्यातील हिंगणी खु. (प्रवर्ग-ना. मा. प्र. स्त्री), अकोट तालुक्यातील धारगड (अ. ज.), वडाळी सटवाई (अ. ज. स्त्री), धामणगाव (अ. ज.), बांबर्डा (अ. ज.), मूर्तिजापूर तालुक्यातील वडगाव (ना. मा. प्र. स्त्री), अकोला तालुक्यातील भौरद (अ. ज. स्त्री), सांगवी मोहाडी (स. सा.), बार्शीटाकळी तालुक्यातील परंडा (अ. ज. स्त्री), जनुना (स. सा. स्त्री), उजळेश्वर (स. सा.), पातूर तालुक्यातील गोंधळवाडी (ना. मा. प्र. स्त्री), तुलंगा खु. (स. सा.) अशा 13 थेट सरपंच पदांचा पोटनिवडणूकीत समावेश आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!