जिल्ह्यात 18 वाळूघाटांच्या ई-लिलावाला मुदतवाढ.
जिल्ह्यात 18 वाळूघाटांच्या ई-लिलावाला मुदतवाढ.
जिल्ह्यात 18 वाळूघाटांच्या ई-लिलावाला मुदतवाढ.
अकोला, दि. 18 : जिल्ह्यातील 18 वाळूघाटांच्या ई-लिलावाला मुदतवाढ देण्यात आली आहे.
अकोला तालुक्यातील कपिलेश्वर, एकलारा, म्हैसांग, उगवा, तसेच बाळापूर तालुक्यातील बहादूरा, सागद, नागद, मांजरी येथील 8 वाळूघाटांच्या ई-लिलावाला अकरावी मुदतवाढ देण्यात आली आहे.
मूर्तिजापूर तालुक्यातील कोळसरा-1, खापरवाडा-2 (खैरी), लोणसणा, बपोरी, पिंगळा दापुरा, बाळापूर तालुक्यातील काजीखेड-2, हिंगणा शिकारी, मोखा, स्वरूपखेड, जानोरीमेळ, तेल्हारा तालुक्यातील वांगरगाव आदी 10 वाळूघाटांना नववी मुदतवाढ देण्यात आली आहे.
या वाळूघाटांच्या ऑनलाईन ई-निविदा दि. 24 फेब्रुवारीला दु. 12 वा. पर्यंत स्वीकारण्यात येतील. तांत्रिक लिफाफा व त्यानंतर आर्थिक लिफाफा दि. 25 फेब्रुवारीला उघडण्यात येईल. ई-लिलाव प्रक्रिया दि. 27 फेब्रुवारीला सकाळी 10 ते दु. 1 वा. दरम्यान होईल, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी विशाल धांडे यांनी दिली.