कित्येक वर्षांपासून बंद दहा राज्यांना जोडणारा महत्वाचा रेल्वे मार्ग खंडवा अकोला मार्ग प्रगतीपथावर.
कित्येक वर्षांपासून बंद दहा राज्यांना जोडणारा महत्वाचा रेल्वे मार्ग खंडवा अकोला मार्ग प्रगतीपथावर.
कित्येक वर्षांपासून बंद दहा राज्यांना जोडणारा महत्वाचा रेल्वे मार्ग खंडवा अकोला मार्ग प्रगतीपथावर.

दहा राज्यांना जोडणारा महत्त्वकांक्षी खंडवा अकोला इंदोर रतलाम चित्तोडगढ मारवाड जंक्शन ह्या रेल्वे लाईनचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून सिकंदराबाद ते अकोट तसेच आकोट ते हिवरखेड रेल्वे लाईन चे काम सुद्धा सुरू झाले आहे. विशेष म्हणजे खंडवा ते आमला खुर्द ह्या लाईनच काम पूर्ण झाले असून सणावद, ते मऊ पर्यंतचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. इंदोर रतलाम तसेच चित्तोड मारवाड जंक्शन या रेल्वे लाईन चे काम पूर्ण झाले आहे. फक्त केवळ आकोट ते अमला खुर्द या रेल्वे लाईन चे काम पहिल्या टप्प्यात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्कालीन खासदार संजय धोत्रे यांनी केलेली मागणी आणि त्यासाठी खासदार अनुप धोत्रे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे याला गती प्राप्त झाली असून अकोला अकोट या रेल्वे लाईन विद्युतीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

खंडवा-अकोला गेज परिवर्तन प्रकल्पांतर्गत, मध्य प्रदेशातील आमलाखुर्द-तुकाईथड रेल्वे विभागादरम्यान तापी नदीवर प्रत्येकी ७६.२ मीटरचे चार ‘ओपन वेब गर्डर’ (OWG) यशस्वीपणे बसवण्यात आले आहेत.
तसेच भूमी अधिग्रहणा सोबत हिवरखेड, तुकाईथड या रेल्वे लाईनचे काम सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू होऊन 2027 पर्यंत पूर्ण काम करण्याचा संकल्प असून त्या दिशेने काम सुरू असल्याचे दिसते.

या रेल्वे लाईन मुळे आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, दिल्ली, दक्षिण भारत या राज्याची दळणवळण जोडला जाणारा आहे. त्यामुळे इंदोर, राजस्थान जाणाऱ्यांसाठी कमी वेळेत चांगली सुविधा मिळणार आहे. खासदार अनुप धोत्रे यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून रेल्वे प्रशासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मध्य रेल्वे यांनी कामाला गती दिली असल्याचे दिसून येत आहे.