नरनाळा महोत्सवात निसर्ग पर्यटनावर विविध कार्यक्रमाचा घेतला जात आहे लाभ, नरनाळा महोत्सवी विशेष बससेवा.
नरनाळा महोत्सवात निसर्ग पर्यटनावर विविध कार्यक्रमाचा घेतला जात आहे लाभ, नरनाळा महोत्सवी विशेष बससेवा.
नरनाळा महोत्सवात निसर्ग पर्यटनावर विविध कार्यक्रमाचा घेतला जात आहे लाभ, नरनाळा महोत्सवी विशेष बससेवा.

अकोला : एस. टी. महामंडळातर्फे अकोला, बाळापूर आणि मुर्तिजापूर येथून नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सवाच्या पोपटखेड येथील मुख्य कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. या तिन्ही शहरांत एस. टी. स्थानकातून आज व उद्या (१६ व १७) दु. 4 वा. विशेष गाड्या सोडल्या जातील.

महोत्सवात निसर्ग पर्यटनावर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे तिन्ही दिवस सकाळी 6 ते सायंकाळी 6 दरम्यान ट्रेकिंग, जंगल सफारी, बोटिंग, नरनाळा किल्ला सफारी असे निसर्गपर्यटनाधारित कार्यक्रम होतील.

दि. 16 फेब्रुवारी रोजी कार्यक्रम –
दि. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता महिला व पुरूषांसाठी ‘मॅरेथॉन- संवर्धनासाठी धाव’ , चित्रकला स्पर्धा व दु. २ वाजता शहानूर येथे पाक कला स्पर्धे, वन्यजीव छायाचित्रण स्पर्धा आयोजन करण्यात आले होते यामध्ये मोठा सहभाग दिसला.

सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी – महोत्सवात प्रत्येक दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम सायं. 5 ते रा. 10 वा. दरम्यान होणार आहेत.
दि. 16 फेब्रुवारीला ‘शिवशंभो गर्जना टीम’कडून सादरीकरण., इंडियन आयडॉल विनर सलमान अली ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ सादरीकरण.
दि. 17 फेब्रुवारी रोजी कार्यक्रम –
महोत्सवात दि. 17 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता भव्य कवीसंमेलन व मुशायरा होणार आहे. दु. 2 वा. ‘इन्व्हेस्टर्स मीट’ होणार असून, पर्यटन क्षेत्रातील संधींबाबत गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्यात येईल. सायं. 7 वा. पद्मश्री कैलाश खेर यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ होणार आहे.
निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृती करणे व मानव आणि पर्यावरण यांच्यातील नाते दृढ करणे हा महोत्सवाचा प्रमुख हेतू आहे. ऐतिहासिक महात्म्य लाभलेला नरनाळा किल्ला व मेळघाटचे समृद्ध जंगल हे अकोला जिल्ह्याचे गौरवस्थान आहे. महोत्सवात अधिकाधिक निसर्गप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना, उपवनसंरक्षक राहूलसिंह टोलिया व जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.