देशमहाराष्ट्र

“अकोला-खंडवा-रतलाम ब्रॉडगेजमुळे 5 राज्ये थेट जोडणार – शेतकरी, व्यापारी, पर्यटकांना मोठा लाभ”

खासदार अनुप संजय धोत्रे यांच्या पाठपुराव्याला यश केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली माहिती.

“अकोला-खंडवा-रतलाम ब्रॉडगेजमुळे 5 राज्ये थेट जोडणार – शेतकरी, व्यापारी, पर्यटकांना मोठा लाभ”

अकोला, दि. 30 जुलै 2026 : विदर्भाच्या विकासासाठी वरदान ठरणाऱ्या _अकोला – खंडवा – रतलाम मीटर गेज ते ब्रॉडगेज रूपांतरण प्रकल्पाचे_ काम अंतिम टप्प्यात आले आहे. खासदार अनुप संजय धोत्रे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत याची माहिती दिली.

319 किमी काम पूर्ण –

473 किमी लांबीच्या या मार्गापैकी _रतलाम – पातालपाणी 144 किमी, ओमकारेश्वर रोड – तुकाईतड 132 किमी आणि अकोला – अकोट 43 किमी_ असे एकूण 319 किमीचे ब्रॉडगेज काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामासाठी जमीन संपादन, पूल आणि स्टेशनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

*5 राज्ये थेट जोडणार, 10 राज्यांना फायदा*  

हा मार्ग पूर्ण झाल्यावर _मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश_ ही 5 राज्ये थेट जोडली जाणार आहेत. तसेच या मार्गामुळे _गुजरात, दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, तामिळनाडू आणि गोवा_ या दहा राज्यांमध्ये जाण्यासाठी विदर्भातील प्रवाशांना सुलभ आणि जलद सुविधा उपलब्ध होणार आहे.

*शेतकरी ते पर्यटक – सर्वांना लाभ*  

या रेल्वे मार्गामुळे *शेतकऱ्यांना त्यांचा कापूस, सोयाबीन, धान्य थेट मोठ्या बाजारपेठेत नेण्यास सुविधा* होणार आहे. त्यामुळे *शेतमालाला योग्य भाव* मिळण्यास मदत होईल.

*व्यापारी आणि उद्योगांना* कच्चा माल व तयार मालाची स्वस्त वाहतूक करता येईल. *वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या नागरिकांना* नोकरी, शिक्षण आणि आरोग्यासाठी प्रवास सुलभ होईल. तसेच *ओंकारेश्वर, उज्जैन, इंदूरसारख्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना* जाणाऱ्या पर्यटकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

*खा. अनुप धोत्रे म्हणाले,* 

“हा केवळ रेल्वे मार्ग नाही तर विदर्भाच्या प्रगतीचा महामार्ग आहे. या प्रकल्पामुळे अकोला हे मध्य भारताचे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन बनेल. शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जी यांचे मी मनापासून आभार मानतो.”

*किसान से पर्यटक तक – सभी को लाभ*  

इस रेल मार्ग से *किसानों को अपना कपास, सोयाबीन, अनाज सीधे बड़ी मंडियों तक ले जाने की सुविधा* मिलेगी. इससे *किसानों को उनकी उपज का उचित दाम* मिलेगा.  *व्यापारियों और उद्योगों* को कच्चे माल और तैयार माल का सस्ता परिवहन संभव होगा.  *विभिन्न क्षेत्रों में रहने वाले नागरिकों* को नौकरी, शिक्षा और स्वास्थ्य के लिए यात्रा आसान होगी.  साथ ही *ओंकारेश्वर, उज्जैन, इंदौर जैसे धार्मिक और पर्यटन स्थलों* पर जाने वाले पर्यटकों को भी बड़ी राहत मिलेगी.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!