सेठ बन्सीधर विद्यालय शताब्दी महोत्सव सन 1925-2025.
शाळेचे पहिले मुख्याध्यापक 101 वर्षीय दादासाहेब आवदे गुरूजींची विशेष उपस्थिती.
शाळेचे पहिले मुख्याध्यापक 101 वर्षीय दादासाहेब आवदे गुरूजींची विशेष उपस्थिती.
सेठ बन्सीधर विद्यालय शताब्दी महोत्सव सन 1925-2025.

शताब्दी महोत्सवात पदार्पण करणाऱ्या तेल्हारा येथील सेठ बन्सीधर विद्यालयाचा मी प्रथम मुख्याध्यापक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या हातून संस्कारित, देश व राष्ट्रप्रेमाबद्दल प्रेम असणारे देशाच्या प्रगतीसाठी झटणारे विद्यार्थी घडवण्याचे भाग्य मला मिळाले. शिक्षण सोपे आहे मात्र चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविणे कठीण काम आहे. ध्येयवादी प्रामाणिकता रुजवण्यात आम्ही यशस्वी झालो असे मनोगत सेठ बन्सीधर विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित माजी विद्यार्थी व गुरूजन स्नेहसंमेलनात विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक 101 वर्षीय सेवानिवृत्त बाळकृष्ण उपाख्य दादा आवदे यांनी व्यक्त केले,

ते विद्यालय शताब्दी महोत्सवात तीन दिवसीय माजी विद्यार्थी माजी गुरुजन सोहळ्यात बोलत होते. 21,22,23 मार्च रोजी आयोजित या कार्यक्रमात 1101 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून तीन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल येथे सुरू आहे. आवदे सर यांनी पुढे बोलताना आपल्या शालेय जीवनातील अनुभवाचे कथन केले. यामध्ये त्यांनी शाळेत दाखल ते सेवानिवृत्ती पर्यंतच्या विविध अनुभव कथीत केले. स्व. मनीलाल शहा व भिकाजी पाटील यांची भेट झाली आणि त्यानुसार शाळेत 35 वर्षे सेवेची संधी मिळाली. माझे विद्यार्थी माझी शाळा अशी भावना असल्यामुळे सुसंस्कृत संस्कारित राष्ट्रप्रेम असणारे विद्यार्थी घडवले आज या शाळेची प्रगती पाहून मला आनंद झाला शाळेची भरभराटी उल्लेखनीय आहे. लावलेले रोपटे विशाल काय वटवृक्षात रूपांतर झालेले पाहताना आनंद होत आहे. सुरुवातीला दादा आवटे यांचे शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ भव्य असे स्वागत करण्यात आले शाळेचे बँड पथक संचालनात औक्षण करण्यात आले. यावेळी माजी शिक्षक, माजी विद्यार्थी निमंत्रित यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
आयोजित विचार पिठाचे अध्यक्षस्थानी सेठ बन्सीधर विद्यालय अध्यक्ष गोपालदास मल्ल उपस्थित होते, तर व्यासपीठावर विठ्ठलराव खारोडे,विलासराव जोशी, राजेंद्र शहा,विक्रम जोशी, गोवा मुक्ती आंदोलनाचे सेनानी विलासराव मुंजे, विद्याभारती संघटनेचे देवगिरी, शैलेष जोशी, छाया शहा, मोहन गद्रे, मनीषा मल्ल, विष्णू मल्ल,शिवम पाडिया, चितळे भाऊसाहेब,ओमप्रकाश झुंझुनवाला,डॉ.विक्रांत जोशी, कैलास अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.