आपला जिल्हा अकोलाधार्मिक

श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त निंबा फाटा येथे बेलखेड येथील श्रींच्या भक्तांची रसवंती सेवा. 

श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त निंबा फाटा येथे बेलखेड येथील श्रींच्या भक्तांची रसवंती सेवा. 

श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त निंबा फाटा येथे बेलखेड येथील श्रींच्या भक्तांची रसवंती सेवा. 

दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्य बेलखेड येथील डॉ. सुभाष नारायणराव सदाफळे व यांचे कडून अविरत पंधरा वर्षे सुरू असलेली सेवा यावर्षी सुद्धा निंबा फाटा शेगाव रोडवर रसवंतीच्या रूपात ताजा ऊसाचा रस पाजून सर्व श्रींच्या भक्तांसाठी आयोजित केली आहे. दरवर्षी सुमारे १५००० ऊसाच्या रसाची ग्लास तृष्णा स्वरूपात प्रसाद रुपात वितरित करण्यात येते. हि सेवा दरवर्षी डॉ सदा फळे व मित्र परिवार प्रकट दिन निमित्ताने दोन दिवस अखंड करतात. यासाठी डाॅ. सदाफळे आपल्या शेतात ऊस लागवड करून ही सेवा श्री भक्तांना करतात. या कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरीता श्री संत सावता मंडळ , बेलखेड व गावकरी बेलखेड यांचे सहकार्य लाभते. सोबतच ऋषिपंचमी च्या दिवशी सुद्धा महाप्रसादाचे आयोजन केले जाते. हि महाप्रसाद सेवा सुद्धा चार दिवस असते.

*दोन दिवस सेवा देणाऱ्या रसवंती गाड्या.-*

दरवर्षी या ठिकाणी बेलखेड तेल्हारा येथील मयूर रामदास चोपडे,शुभम प्रकाश बोंडे ,आकाश प्रकाश बोंडे, वैभव किसन चोपडे, आकाश निवाने, राष्ट्रपाल डीगे,सुरज निवाने, अंकीत काळपांडे यांच्या रसवंतीच्या या गाड्यांची सेवा राहते. याच सेवेतून त्यांना स्वतः लघु व्यवसाय करण्यास चालना मिळाली. दरवर्षी सेवा देण्यासाठी उभ्या झालेल्या रसवंती गाड्या ह्या सेवेतून उदरनिर्वाह चे माध्यम बनल्या. प्रकट दिन सेवा झाल्यानंतर ते रसवंती गाड्या तेल्हारा शहरातील विविध ठिकाणी व्यवसाय करून या रसवंती उदरनिर्वाह चे साधन बनल्या हे येथे उल्लेखनीय आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!