आपला जिल्हा अकोला

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती., अनिता मेश्राम भाप्रसे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला यांचे पत्र.

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती., अनिता मेश्राम भाप्रसे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला यांचे पत्र.

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती., अनिता मेश्राम भाप्रसे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला यांचे पत्र.

ग्रामपंचायत अधिनियम कलम, १५१ मधील, पोट कलम (१) मध्ये, खंड (क) मध्ये परंतू नंतर जर नैसर्गीक आपत्ती किंवा आणिबाणी किंवा युध्द किंवा वित्तीय आणिबाणी किंवा प्रशासकीय अडचणी किंवा महामारी, इत्यादीमुळे राज्य निवडणुक आयोगाच्या वेळापत्रकानुसार पंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य झाले नसेल तर राज्य शासनास, पंचायतीचा प्रशासक म्हणुन योग्य व्यक्तीची नियुक्ती करता येईल अशी तरतुद आहे. तसेच मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणुन योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याबाबत संबधीत जिल्हयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे.

त्याअर्थी अनिता मेश्राम भाप्रसे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन अकोला जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणुन संदर्भ क्र.४ अन्वये प्राप्त पत्रात नमुद ग्रामपंचायतीवर प्रशासक यांची नियुक्ती पत्रात नमुद अधिकाऱ्यांची नेमणुक करीत आहे. नियुक्त प्रशासक यांनी दिलेल्या ग्रामपंचायतीचा पदभार तात्काळ स्विकारुन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मधील तरतुदी व वेळोवेळी दिले जाणारे शासन आदेशानुसार कामकाज करावे. संबधित प्रशासक यांना ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये मतदानाचा अधिकार असणार नाही. तसेच त्यांनी मुळ पदाचे कामकाज सांभाळुन प्रशासक पदाचे काम पहावयाचे आहे. सदर कामकाज करतांना कोणतिही अनियमितता / गैरकायदेशिर बाबी होणार नाही याची दक्षता घ्यावी. संबधीत ग्रामपंचायतीची निवडणुक होऊन सरपंच पदाची पहिली ग्रामपंचायतीची सभा झाल्यापासुन संबधीत सरपंचास त्यांचे अधिकार, कार्य व कर्तव्य ताबडतोब बहाल होतील याची दक्षता घ्यावी असे आदेशीत केले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!