श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवाची सांगता भव्य महाप्रसादाने.
श्री संत गजानन महाराज मंदीर बेलखेड कमेटी सदस्य व बेलखेड ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांनी घेतले अथक परिश्रम.
श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवाची सांगता भव्य महाप्रसादाने.श्री संत गजानन महाराज मंदीर बेलखेड कमेटी सदस्य व बेलखेड ग्रामस्थ, तथा पंचक्रोशीतील भाविकांनी घेतले अथक परिश्रम.

बेलखेड येथे श्री संत गजानन महाराज मंदिरात गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या प्रकट दिन महोत्सवाची रविवारी सांगता झाली. यावेळी आयोजित महाप्रसादाचा हजारो भावी भक्तांनी लाभ घेतला.

पंचक्रोशीतील भक्तांचे श्रद्धास्थान श्री संत गजानन महाराज मंदीर बेलखेड येथे 1 फेब्रुवारीपासून या महोत्सवाला सुरुवात झाली. आळंदी देवाची येथील हभप भागवताचार्य संदीप गिऱ्हे महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून भाविकांनी भागवत कथेचा लाभ घेतला. भागवत कथेबरोबरच दररोज रात्री महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आपली कीर्तन सेवा या ठिकाणी सादर केली.

यामध्ये ह. भ. प. तेल्हारकर महाराज, समाज प्रबोधनकार संदीपपाल महाराज, शिवव्याख्याते संतोष महाराज मनसुटे, योगेश महाराज पाचपोर, शुकदास महाराज गाडेकर आणि ६ फेब्रुवारी रोजी हभप वैष्णवीदीदी राऊत यांचे कीर्तन पार पडले. दि. ७ तारखेला बेलखेड गावांमधून श्रींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. ८ तारखेला सकाळी ९ वाजता भागवताचार्य संदीप गिऱ्हे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर या सोहळ्याची सांगता झाली. आठ दिवस दररोज भागवता बरोबरच श्री संत गजानन महाराजांचे पारायण वाचन प्रफुल्ल महाराज डिवरे यांच्या वाणीतून झाले. दररोज पहाटे सकाळी काकड आरती, श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण, भागवत कथा, हरिपाठ, हरी किर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

दि. 8 फेब्रुवारी रोजी प्रगट दिनाच्या महोत्सवाची सांगता झाली. सकाळी काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाला सुरूवात झाली. पंचकोशीतील हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी गावातून श्री ची मिरवणूक काढण्यात आली. वेगवेगळ्या आकर्षक देखावे लक्ष वेधक होती. ग्रामस्थांनी अंगणात रांगोळ्या काढून आणि घरासमोर दिव्याची रोशनी करून ठिकठिकाणी पालखीचे स्वागत केले.

प्रकटदिनी मंदीर परिसरात यात्रा भरली. विविध प्रकारचे आकाशी पाळणे,लहान मुलांना खळणे,विविध वस्तू चे दुकान,प्रसाद,हार पुष्प अशा दुकाने लागल्याने नागरिकांनी यात्रेचा आनंद घेतला. तत्पूर्वी निष्काम सेवा प्रतिष्ठान चे वतीने आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. प्रगट दिनी मंदिर समितीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये नागरिकांनी रक्तदान केले. प्रकटदिन सोहळा सप्ताहाच्या शेवटच्या दिवसा पर्यंत श्री संत गजानन महाराज मंदीर बेलखेड कमेटी सदस्य व बेलखेड ग्रामस्थ, तथा पंचक्रोशीतील भाविकांनी अथक परिश्रम घेतले.
